ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले बाबूराव गुंडावार यांना निलंबित करण्याची मागणी-  आमदार प्रतिभाताई धानोरकर

0
221

चंद्रपूर :- मागील अनेक वर्षापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा मधील चंद्रपूर कार्यालयात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले बाबूराव गुंडावार कर्मचारी यांना निलंबित करण्याची व त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी हिवाळी अधिवेशनातील सभागृहात मुद्दा उपस्थित केला.

वन विभागामध्ये काम वरून सेवानिवृत्त झालेल्या गुंडावार यांना कंत्राटी पद्धतीने मागील अनेक वर्षापासून कामावर ठेवलेले आहे.ओपन बस (canter) सफारी बुकिंग व  अकाउंटच्या कामाकरिता चंद्रपूर कार्यालयात कार्यरत आहेत .

प्राप्त माहितीनुसार ओपन बस (canter) सफारी बुकिंग करिता बरेच पर्यटक त्यांच्याशी संपर्क साधतात. पण त्यांच्या उद्धट बोलण्याने नाराज होऊन परत जातात. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एवढी माज कसली असे बरेच लोक म्हणत आहेत. वनविभागात काम करण्यास  दुसरे कर्मचारी का ठेवले जात नाही?
सफारी बुकिंग मधील घोळ बाहेर आणण्यासाठी एक कमिटी तयार करून बुकिंग मधील घोळ उघडकीस करण्यात यावे असे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला आहे.
यावर राज्याचे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी या कंत्राटी कर्मचाऱ्यावर काय कार्यवाही करतात याकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here