
मूल :- मूल तालुक्यातील करवण येथील शेतात काम करण्यास शेत मजुर गेले असता शेत मजुरावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना करवण बिटातील कक्ष क्र. 756 मध्ये दि.31 मई 2022 रोजी सकाळी 8.00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.सदर घटनेत मृतकाचे नाव रामभाऊ कारु मरापे वय (42) वर्ष आहे.
सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व मौका पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार मुल येथील सुरेश हरडे यांच्या मालकीच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करीत असणारा रामभाऊ वर आज सकाळी 8.00 वाजताच्या सुमारास शेतात काम करण्यास गेले असता अचानक वाघाने हल्ला करुन जागीच ठार केले. करवण गाव हा जंगल परिसरात असल्याने त्यापरिसरात वारंवार वाघाचे हल्ले होत आहे व वाघाचा बंदोबत करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. पुढील तपास वन विभाग करीत आहे.
