आज बुधवार दि. 31 मार्च रोजी मिळालेल्या गुप्त माहिती वरून वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य तथा मानद वन्यजीव रक्षक सातारा रोहन भाटे व विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, साहाय्यक वनसंरक्षक सचिन निलक , वनक्षेत्रपाल आर आर पाटील यांनी खेड चिपळूण रा.महामार्ग क्रम.17 स्त्यावर सापळा रचला.
सहा शिकारी पकडण्यात आले आहेत तर एक जिवंत दुर्मिळ खवल्या मांजर या सहा जणांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
ह्या व्यतिरिक्त दोन दुचाकी चाकी जप्त करण्यात आली
सदर सापळ्यात मिळालेल्या गुप्त माहिती वरून वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत विशिष्ट संरक्षण मिळालेले दुर्मिळ असे जिवंत खवल्या मांजर विक्रीसाठी येणार असल्याचे समजले होते.
त्यानुसार खेड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 साईबाबा ढाबा खेड रेल्वे स्टेशन जवळ सापळा रचण्यात आला. आरोपी हे विक्री करण्यासाठी जिवंत खवल्या मांजर लपवून ठेवलेल्या जागे वरून दुचाकीवरून पोत्यामध्ये काही अंतर घेऊन आले .
विक्रीसाठी आल्यावर आणलेल्या पोत्यामध्ये जिवंत खवल्या मांजर असलेली खात्री झाल्यावर तात्काळ झटापट करून चार जणांना चार चाकी गाडी मध्येच अटक करण्यात आली आहे.
तर इतर दोन जणांना शेजारी 100 मीटर अंतरावरून अटक करण्यात आली आहे.
पकडलेल्या आरोपींची नावे –
महेश विजय शिंदे वय 35 रा.खेड ता.खेड जिल्हा रत्नागिरी, अंकुश रामचंद्र मोरे वय 48 राहणार पोखळवणे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी,समीर सुभाष मोरे वय 21 राहणार पोखळवणे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी,
उद्धव नाना साठे वय 38 रा. ठाणे जिल्हा ठाणे,अरुण लक्ष्मण सावंत वय 52 रा ठाणे जि ठाणे,अभिजित भार्गव सागावकर वय 32 रा.सुकवली,ता खेड, जिल्हा रत्नागिरी
वरील सहा आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे तर त्यांच्याकडून तस्करी करून विक्रीसाठी आणलेले दुर्मिळ खवल्या मांजर हस्तगत करण्यात आले आहे.
त्यांच्या कडून दोन दुचाकी चाकी जप्त करण्यात आली आहे.
सदर आरोपी ह्यांनी ह्या पूर्वी असे अनेक कारनामे केले असल्याचे समजते. पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई मध्ये वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो तथा मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन निलाख, वनक्षेत्रपाल आर आर पाटील, वनपाल खेड अनिल दळवी,वनरक्षक परमेश्वर डोईफोडे,आर आर शिंदे,द रा सुर्वे, अरविंद मांडवकर,सचिन बनकर, वही डी झाडे, हे सहभागी होते. तसेच स्थानिक गुन्हे अनिवेशन विभाग व पोलीस विभाग रत्नागिरी यांनी मोलाची मदत केली.