चंद्रपूर वन विभागाअंतर्गत आगडी येथील गावालगत जंगलात मोहफुल गोळा करण्यास गेली असता एका महिलावर झुडपात दबा धरून बसलेला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज दिनांक 31 मार्च बुधवार रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आली .
मृत महिलेचे नाव कल्पना नामदेव वाढ़ई वय 54 राहणार आघाडी येथील होती. सगळीकड़े मोहफुल आलेले आहेत त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार नसल्यामुळे काही ग्रामस्थ मोहफुल वेचून त्यावर आपले उदरनिर्वाह करतात अशाच वेळी आगडी येथील कल्पना नामदेव वाढ़ई आपल्या आई कौशल्या मांदाडे सोबत आज गावा लगत असलेल्या जंगलातील जनलला बिट च्या कंपार्टमेंट क्र. 115 मध्ये दोघेही मोहफुल गोळा करण्यास गेले होते मोहफुल गोळा करण्यास खूप उशीर होत होता म्हणून तिची आई कौशल्या ही म्हातारी असून डोळ्याने कमजोर होती. ती घरी जेवण करण्यास लवकर परत आली. मात्र बराच वेळ झाल्यावर देखील कल्पना घरी आली नाही म्हणून आई ने आपल्या नातू उमेश वाढ़ई याला सांगितल व उमेश जंगलात जाऊन कल्पनाचा शोध घेतला कल्पना ही मृत अवस्थेत कंपार्टमेंट क्र. 115 मध्ये आढळून आली . अंगावरील जखमामुळे कल्पनाला वाघाने मारले याची खात्री झाली.
सदर माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला दिली.
माहिती मिळताच वन विभागाचे वनपाल प्रशांत खनके, वनरक्षक राकेश गुरनुले, वनपरिक्षेत्र अधिकारी राजूरकर, चौधरी शिरोली, पोलीस चौकीचे पठाण, पंचायत समिती सदस्य वर्षा लोनवले, दामोदर लेनगुरे व गावकरी यांनी घटनास्थळी उपस्थित होते.
पुढील तपास वनविभाग करत आहे.