चंद्रपुर:
दरवर्षी प्रमाणे यावेळी देखील वन्यजीव सप्ताह 2021 01/10/2021 ते 07/10/2021 पर्यंत साजरा करण्यात येत आहे.
मोहर्ली (वन्यजीव) वनपरिक्षेत्र अंतर्गत “जागतिक वन्यजीव सप्ताह” जागरूकता कार्यक्रम आयोजित केला जात आहे जेणेकरून विद्यार्थी, तरुण आणि वृद्ध ग्रामस्थ आणि कर्मचारी यांच्यामध्ये वन्यजीवांबद्दल प्रेम आणि प्रतिष्ठा निर्माण होईल
01/10/ 2021 ते 07 /10/ 2021 पर्यंत वन्यजीव सप्ताह साजरा करण्याबाबत रूपरेषा अशा आहेत.
01/10/2021 रोज पर्यटकांचे उद्घाटन, पर्यटकांचे स्वागत, ग्रामस्वच्छता अभियान, प्लास्टिक निर्मूलन, पर्यटन मार्गदर्शन पर्यटन प्रवेश द्वार मोहर्ली व मोहर्ली गावात सकाळी 06 ते 11 वाजता घेण्यात येत आहे.
02/10/2021 वन्यजीव प्रबोधन पटनाट्य अंधश्रद्धा निर्मूलन, माहितीपट दाखविणे भामडेळी गावात 11 वाजता घेण्यात येत आहेत.
03/10/2021 वन्यजीव प्रबोधन पटनाट्य अंधश्रद्धा निर्मूलन मुधोली गावात सकाळी 11 वाजता घेण्यात येत आहे.
04/10/2021 रोजी चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, वन्यजीवावर प्रबोधनाचे कार्यक्रम संत गाडगेबाबा विद्यालय, मोहर्ली व जिल्हा परिषद उच्च शाळा घेण्यात येत आहे.
जिप्सी रॅली सप्ताह प्रचार, सभा व मार्गदर्शन पर्यटन प्रवेश द्वार मोहर्ली ते वडाला सकाळी 10 वाजता आहे.
07/10/2021 रोजी समारोप कार्यक्रम वन सभागृह घेण्यात येत आहे.