ताडोबा बफर प्रशासनाची संवेदनशीलता आणि गतीमानता ; वाघाचा हल्ल्यात मृत कुटुंबाला 2 दिवसात 25 लाखाचे नुकसान भरपाई

0
261

चंद्रपूर : मोहर्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या भद्रावती तालुक्यातील टेकाडी गावातील महिला श्रीमती लक्ष्मीबाई रामराव कन्नाके वय 60 वर्ष शेतात काम करत असताना अचानक वाघाने हल्ला करून जागेच ठार केले. वन विभागाने तात्काळ कारवाही करून मृतकाचा वारस पती रामराव जगन्नाथ कन्नाके यांच्या  बँक खात्यात 10 लाख रुपये जमा करण्यात आले व उर्वरित 15 लाख रुपये मृतकाचे सर्व वारस यांचे बँक खात्यात फिक्स डिपॉझिट जमा करण्यात येणार आहे याकरिता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी पुढाकार घेऊन वारसांना तात्काळ मदत मिळवून दिली.

भविष्यामध्ये मानव वन्यजीव संघर्ष होऊ नये म्हणून गावांमध्ये जनजागृती करत बोर्ड आणि बॅनर लावण्यात आले आहे.
वन्यप्राणी यांच्यापासून सावधगिरी बाबत ऑडिओ क्लिप तयार करून लाऊडस्पीकर द्वारे जनजागृती करण्यात येत आहे व तसेच विशेष व्याघ्र संरक्षण दलची टीम आणि 25 सदस्य PRT यांचे द्वारे शेत शिवार परिसरात वाघाच्या हालचाली टिपत आहे.
सदर परिसरात 20 कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने सह नियंत्रण कारवाई सुरू आहे व तसेच शेतकरी यांना मुखवटे वाटप करण्यात आलेले आहे.


NTCA यांचे मार्गदर्शक सूचने अन्वये समिती गठीत करण्यात आली असून समितीने केलेल्या उपाय योजना अवलंबिल्या जात आहे व भविष्यामध्ये मनुष्यहानी टाळण्यासाठी उपसंचालक (बफर) कुशाग्र पाठक यांचे मार्गदर्शनाखाली मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे कार्यवाही करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here