नागपूर :
नागपूर वनविभागाच्या चमुव्दारे मध्यप्रदेशातील बिछवासहानी या गावात दिनांक 29/07/2021 रोजी रात्री 9.30 वाजेच्या समुरास धाड टाकून वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या मोतीलाल केजा सलामे, वय 55, रा. बिछवासहानी या आरोपीस ताब्यात घेतले आहे. सदर कार्यवाहीत नागपूर वनविभागाच्या चमुने सदर आरोपीच्या शेतशिवारातील घरातून मृत वाघाची संपूर्ण कातडी-1, पायाचे चार पंजे, व आरोपीचा जिओ कंपनीचा एक मोबाईल जप्त करण्यात आले.
सदर वनगुन्हा प्रकरणी आरोपी मोतीलाल केजा सलामे, वय 55, यांचे विरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम,1972 चे कलम 2(16), 9, 39, 49, 43(ए), 50 व 51 नुसार वनगुन्हा क्र.04980/124476, दि.29/07/2021 गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सदर प्रकरणात अधिक चौकशी करीता नागपूर वनविभागाव्दारे मा. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, सावनेर यांचे न्यायालयातून आरोपी यांना दि.03/08/2021 पर्यंत वन कोठडी मिळालेली आहे.
उपरोक्त कार्यवाही ही नागपूर वनविभागाव्दारे डॉ. भारत सिंह हाडा, उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख श्री. एन.जी.चांदेवार, सहाय्यक वनसंरक्षक (जंकास-2) उमरेड, श्री. पी.एन. नाईक, वनपरिक्षेत्र अधिकारी, खापा, एल.व्ही. ठोकळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, बुटीबोरी, एस.बी.मोहोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, फिरते पथक, क्र.2 नागपूर व खापा वनपरिक्षेत्रातील वनरक्षक डोंगरे, शेंडे आणि उप वनसंरक्षक (तेंदू व कॅम्पा) नागपूर यांच्या मागदर्शनाखाली चौकाशी सुरू आहे.