
(जंगलात सौचास बसने बेतले जिवावर)
जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर) :- भगवानपुर येथील इसम ताराचंद चंदनखेडे,ब्रह्मपुरी येथे डिझेल आणायला जात असताना, जंगलात संडासला बसलेला असता वाघाच्या हल्ल्यात ठार झाला.
सविस्तर बातमी अशी की सदर व्यक्ती हे अड्याळ ला शेतात टॅक्टर सुरु असल्या मुळे डिझेल साठी ब्रम्हपुरी ला जात होते. रस्यात संडास लागली त्यामूळे बाजूला झाडाच्या आडोशाला बसले असता वाघाने जंगली डुक्कर समजुन अचानक त्याचे वर हल्ला केला.
सदर घटनेत वाघाने व्यक्तीला दुर ओढत नेले व या हल्यात मृत व्यक्तीचे हात, व डोके धळावेगळे केल्या अवस्थेत काही लोकांना दिसून आले.
सदर घटनेची माहीती ब्रम्हपूरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना माहिती मिळताच वनपरीक्षेत्र आधिकारी यांच्या टिमने मौका चौकशी केली व शवविच्छेदनासाठी ब्रम्हपूरी येथे पाठविण्यात आले.
मृतक व्यक्ती दि. २८ जून २०२२ सायकांळी ५.०० ते ६ . ०० वा च्या दरम्यान लापत्ता झाले होते. आज दि.२९ जून २०२२ रोजी पाहाटे ५.३० वाजताच्या दरम्यान त्यांचा मृतदेह मिळाला.
