रामदेगी धार्मिक स्थळावर ठोकला बोथली ग्रामसभेने सामुदायिक वनहक्क दावा

0
483

चंद्रपूर :- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन वनक्षेत्रात येत असलेल्या रामदेगी व संघारामगीरी या धार्मिक स्थळांच्या वनभूमीसह अनुसूचित जमाती व इतर पारंपरीक वन निवासी अधिनियम २००६ व नियम २००८ आणि सुधारणा नियम २०१२ नुसार  चिमुर तालुक्यातील बोथली(वहा) ग्रामसभेने कायदेशीर प्रक्रिया  पूण करून ४५०० एकर वनभमुीवर सामुदायीक वनहक्क दावा उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष उपविभागीय स्तरीय वनहक्क समिती चिमुर यांच्याकडे ग्राममसभा प्रतिनिधी शिष्टमंडळाने नकुताच सादर केला.

गाव समुहाच्या एकुण ९८४ सदस्यांनी सामुदायीक वनहक्क दाव्याची मागणी संपुण भरुन दि. ४ मई २०२२ रोजी स्थानिक वनहक्क समितीकडे पुढिल कार्यवाहीसाठी सादर केला आहे.
यात सामुदायीक वनहक्क दावा-१ व वनहक्क कायद्याचे कलम ३(१)(क) नुसार  वैयक्तिक वनहक्क दाव्यात रहिवाशांसाठी रामदेगी ९, संघारामगीरी-७ व उपजीविकेसाठी बोथली येथील २६ वनहक्क दाव्याचा समावेश आहे. त्यामुळे सामुदायिक व वैयक्तिक दाव्यावर कार्यवाही करण्यासाठी वनहक्क समितीने  नियम
१२(१) नुसार प्राप्त वनहक्क  दाव्याची प्रत्यक्ष पडताळणी  करण्यासाठी दि. २० मई २०२२ रोजी सभा बोलावून तहसिलदार चिमुर, वनपरिक्षेत्र  अधिकारी (बफर) खडसंगी, उप अधीक्षक भूमी अभिलेख चिमुर, संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती चिमुर, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रदेशिक) चिमुर, ग्राम पंचायत बोथली यांना पडताळणीचे वेळी नियम१२ (४)  नुसार बोथली गावाचे संदर्भातील सर्व माहिती, अभिलेख, दस्ताऐवज, बंदोबस्त  मिसल, राजस्व व वन नकाशे यांच्या सत्यप्रती सोबत घेऊन पडताळणीचे वेळी वनहक्क समितीला सहकार्य करण्यासाठी  लेखी सुचना दिल्या होत्या. त्यामुळे समितीने  सर्व दाव्या ची पडताळणी करून समितीने  नोंदविलेल्या निष्कर्ष अहवालावर ग्रामसभेत चर्चा करून योग्य ठराव पारित करण्यासाठी दि. २१/५/२०२२ रोजी बोलविण्यात आलेल्या ग्रामसभेत सर्वसहमतीने सामुदायिक व वैयक्तिक अशा सर्व ४३ वनहक्क दाव्यांना मंजुरी देऊन ठराव मंजुर करण्यात आला.
बोथली (वहा) ग्रामसभने केलेल्या सामुदायिक व वैयक्तिक वनहक्क दाव्यातील  सर्व तपशील योग्य असल्याची खात्री  ग्रामसभा सचिव तथा बोथली ग्राम पंचायतचे ग्रामसेवक भागवत नरड यांनी करून वनहक्क दावे मान्य करण्याची शिफारस दाव्यांचा मूळ प्रतीत आवश्यक दस्ताऐवजासह उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष  उपविभागीय स्तरीय वनहक्क समिती चिमुर यांचेकडे सर्व दावे सादर करण्यात आले.
ही सर्व वनहक्क दाव्यांची प्रक्रिया अँड. विजय देठे यांच्या मार्गदर्शना खाली सामाजिक कार्यकर्ते माधव जिवतोडे व शंकर भरडे यांनी केले.

गाव स्थरांवरील वनहक्कची प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सरपंच तथा वन हक्क समितीचे सचिव विनोद देठे वनहक्क समितिचे अध्यक्ष रामकृष्ण वाघ, उपसरपंच देवराव नन्नावरे, माजी सरपंच जागेश्वर थुटे, रामकृष्ण गेडाम, किशोर श्रीरामे, योगशे लाडसे, राहुल पोहणकर, आकाश आंबोलकर, पुंडलिक गेडाम, रविंद्र सोनवणे, अधिकार घोडमारे, सविता दोडके व समस्त ग्रामसभेने परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here