सेलू :
घोराड येथील पांडुरंग मनोहर सुरकार यांच्या चिचोली येथील शेत-शिवाराच्या गोठ्यात बांधलेल्या दोन वासरांना बिबट्याने ठार केले. ही घटना दिनांक 28 एप्रिल बुधवारी रोजी उघडकीस आली . घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. वनविभागाने घटनेची नोंद करून शेतकरी सुरकार यांचे 15 हजाराचे नुकसान झाले आहे. वनरक्षक एन. के. पाचपोर व प्रतीक तेलंग यांनी मौका पंचनामा केला.
या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर जास्त प्रमाणात आहे तेव्हा यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
बोर व्याघ्र प्रकल्प जवळ असल्यामुळे वन्यप्राण्यांचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे .वन्यप्राण्यांच्या त्रास कमी करण्यासाठी शेत कुंपण ची मागणी शेतकऱ्यांनी वन बिभागाकडे केलेले होती अध्याप पूर्ण झालेली नाहीत. वनविभागाने याकड़े लक्ष द्यावे जेणेकरून मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्यास फार मदत होईल.