
चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग); जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी काही महत्त्वाचे कंपन्याना विदेशी पर्यटक वारंवार भेट देत असतात या भेटी दरम्यान विदेशी पर्यटक होमस्टे, हॉटेल, रिसॉर्ट आणि विश्रामगृह मध्ये वास्तव्यास असतात .अशा वेळेस त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, काही काळजी घेणे गरजेचे असते त्याकरिता आज दि. 28 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता मंथन हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर येथे बैठकीचे आयोजन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या उपस्थितीत घेण्यात आले.
सी फॉर्म ऑनलाईन भरण्याकरिता indianfor.govin/frroadmin यासंकेत स्थळावर रजिस्ट्रेशन करणे आहे. रजिस्ट्रेशन करण्याकरिता रिसॉर्ट/ होमस्टे / हॉटेल चे कागदपत्र (लायसन), ओळख पुरावा, रहिवासी पुरावा इत्यादी असणे आवश्यक आहे व त्यानंतर अप्रुव्हल करिता चंद्रपूर पोलीस अधीक्षक कार्यालय मध्ये प्रतिभा गोधाणे 7774034868 (कॉन्स्टेबल) यांच्याशी संपर्क करून सी फॉर्म रजिस्ट्रेशन ला अप्रुव्हल करावे लागते. अप्रुव्हल एक वेळा झाल्यावर मग तुम्हाला ऑनलाईनच सी फॉर्म भरावा लागतो, तसेच अधिक माहिती करिता विजय राठोड (इन्स्पेक्टर) 9689863888 यांच्याशी संपर्क करावे असे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी म्हणाले.
सी फॉर्म भरतांना आवश्यक कागदपत्र
पासपोर्ट
विझा कार्ड
विदेशी नागरिकांची संपूर्ण माहिती
विदेशी नागरिकांचा लाईव्ह फोटो
आपल्या होमस्टे, रिसोर्ट, हॉटेल, विश्रामगृह मध्ये थांबण्यात येणारे संपूर्ण कालावधी
ही सर्व माहिती भरणे गरजेचे आहे..
तसेच चंद्रपूर जिल्ह्यात आपल्या विदेशी नागरिकांनी 01/01/2023 ते 28/08/2023 पर्यंत सी फॉर्म भरण्यात आले असल्याची माहिती याप्रमाणे आहे,
रामनगर पोलीस स्टेशन
एन.डी. हॉटेल 46
सिद्धार्थ प्रीमियम हॉटेल 17
शेंगाव पोलीस स्टेशन
वाघोबा रिसॉर्ट 53
सवसारा रिसॉर्ट 120
बल्लारपूर पेपर मिल 2
असे एकूण 4 पोलीस स्टेशन मधून 5 रिसोर्ट चे 231 सी फॉर्म प्राप्त झाले आहे असे आकडेवारी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी सांगितले.
सी फॉर्म भरणे का आवश्यक आहे
जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात व इतर कंपनीत विदेशी पर्यटक व विदेशी नागरिक चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येत असल्याचे पोलीस विभागाचा निर्देशनात आले असून हे विदेशी नागरिक व विदेशी पर्यटक आपल्या रिसोर्ट, हॉटेल, होमस्टे, विश्रामगृह या ठिकाणी वास्तव्यास असतात. सदर वेळी अशा विदेशी नागरिक व विदेशी पर्यटकांची आपल्या येथे वास्तव्य असताना विदेशी नागरिक कायदा 1946 कलम 7 नुसार प्रत्येक विदेशी पर्यटक व नागरिक त्यांचे सी फॉर्म ऑनलाइन भरून पोलीस कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे. तसेच सदर नागरिकांचे सी फॉर्म रजिस्ट्रेशन आपले येथे राहत्या ठिकाणी रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे.
या वेळेस चंद्रपूर जिल्ह्यातील मोहर्ली येथील मितेश रामटेके( एम.टी.डी.सी.रिसॉर्ट), नाहीद सिद्दिकी ( द लेक विव्हू), शुभम डिमोले (ताडोबा टायगर व्हॅली), दिनकर रुपदे (रॉयल टायगर रिसोर्ट), मोहम्मद सुलेमान बेग (ताडोबा होमस्टे कॉटेज) , मुस्कान बेग (तथास्तु रिसोर्ट), ईशांत नारनवरे (हॉटेल ताडोबा टायगर इन), नरेंद्र बुरडकर (ईगल माउंटेन रिसोर्ट), हर्षल तारगे (ईगल नेस्ट होमस्टे), द सेंचुरी रिसोर्ट (प्रतिनिधी) टायगर होमस्टे (मुकेश शिवनकर), लिंबन रिसोर्ट (साहिल बेग), सराई रिसोर्ट, जंगल कॅम्प, बांबू रिसोर्ट, झरणा रिसोर्ट, वनराई रिसोर्ट, वाघोबा इको लोज, ताडोबा वन्यविला, सिद्धार्थ प्रीमियम हॉटेल (मालक), रेड अर्थ रिसोर्ट (मॅनेजर), अगरझरी टायगर रिसोर्ट (मॅनेजर), ACC सिमेंट, अंबुजा सिमेंट, माणिकगड सिमेंटचे (मॅनेजर) आदी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
