
जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर): भंडारा जिल्ह्यातील पाहुणे वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जंगल परिसरात आज दि. 28 जून 2023 रोजी एका इसमास ठार केल्यामुळे वनविभाग एवं परिसरातील लोकांसाठी डोके दुखी ठरलेला आणि सात दिवसात दोन इसमास ठार करणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश मिळाले.
RRT भंडारा, नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्प यांचे पथक, RRT गोंदिया यांनी संयुक्त रित्या ही कारवाई करण्यात आली आहे. सतत वाघाच्या हल्ल्यामुळे .
वाघाला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली होती.
आणि विशेष म्हणजे आक्रोशीत असलेल्या जनतेने आजच्या या वाघाने मारलेल्या माणसाच्या घटनेनंतर घटनास्थळी पंचनामा करायला आलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करून मारहाण केली त्यात तीन वनकर्मचारी गंभीर जखमी झाले व त्यांना नागपूरला रेफर करण्यात आले.
त्यानंतर वनविभागाने तातडीने सूत्रे चालवीत अखेर ड्रोनच्या सहाय्याने या वाघाचा शोध घेऊन त्याला बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर त्याला जेरबंद करण्यास आले.
यावेळी उप वनसंरक्षक राहुल गवई, उपविभागीय वन अधिकारी विगीलन्स कोडपे, सहाय्यक वनसंरक्षक साकेत शेंडे, रोशन राठोड, क्षेत्रीय वनअधिकारी रूपेश गावित, ठोंबरे, लहू ठोकरे, मानद वन्यजीव सदस्य नदीम खान आणि शाहीद खान हे उपस्थित होते.
जरी या परिसरातून या वाघाला जोरबंद करण्यात आले असले तरी परिसरातील जनतेने या परिसरात वावरताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण लोकांच्या मागणीनुसार एका वाघाला जरी जोरबंद करुन नेले तरी त्त्याच्या जागी जंगलातून दुसरा वाघ येऊन त्यापरिसरात अधिवास करू शकतो म्हणून जंगल परिसरात सावधपणे वावरने अत्यंत आवश्यक आहे .
