पवनी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात आणखी एक ठार : एका आठवड्यात दुसरा बळी, संतप्त जमावाचा वनरक्षकावर हल्ला

0
164

वाघाने ही गर्दीवर हल्ला करून केले एका युवकास जख्मी

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):
पवनी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात आणखी एक ठार झाल्याची घटना आज दि. 28 जून 2023 रोजी उघडकीस आली. या परिसरातील आठवड्यातील दुसरी घटना असल्याने  परिसरातील नागरिकांच्या संतप्त जमावाने वन रक्षकावर हल्ला केला.
सदर घटनेत वाघाच्या हल्ल्यात  मृतकाचे नाव ईश्वर सोमा मोटघरे , वय ५८, रा. खातखेडा असे आहे.
मृतक हा खातखेडा गावच्या बस स्टॉप मागे शेत शिवारात शेळ्या चराई करत असताना शेळ्यांजवळ बसून असलेल्या ईश्वरच्या  मागून येऊन वाघाने अचानक हल्ला केला व त्याला ओढून जंगलाच्या दिशेने घेऊन गेला.


फक्त शेळ्याच घरी परत आल्यामुळे मृतकाच्या पत्नीने ग्रामस्थांसोबत शोधाशोध केली असता मृतकाच्या जवळ दोन वाघ आढळून येताच त्यांनी आरडाओरडा करून गावातील लोकांना बोलवून वाघाला हाकलून लावले.
यापूर्वी देखील २३ जून रोजी पवनी तालुक्यातील गुडेगाव येथील निवासी सुधाकर कांबले वय (45) वर्ष यांच्यावर वाघाने पहिला बळी घेतला होता.
सदर घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये रोष दिसून येत आहे.

सदर घटनेची माहिती वन विभागाला मिळतात घटना स्थळी वनअधिकारी दाखल झाले व मौका पंचनामा करण्यास आलेल्या  वनअधिकाऱ्यांवर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी  हल्ला केला.
यावेळेस सहायक वनसंरक्षक यशवंत नागुलवार, वनपाल वावरे आणि गुप्ता यांना ग्रामस्थांच्या हल्ल्यात   गंभीर जखमी झाले व त्यांचा स्थानिक रुग्णालयात प्रथमोपचार करून नागपुरातील खासगी इस्पितलात रेफर करण्यात आले.
ग्रामस्थांनी  प्रेत उचलू देण्यास अडथळा निर्माण केले व वन कर्मचाऱ्यावर हल्ला केल्यामुळे परिस्थिती सांभाळण्याकरिता  दंगा रोधक पथकाला बोलविण्यात आले.
मात्र घटना स्थळी परिसरातील लोकांनी गर्दी करून वाघ हाकलण्याची मागणी करत जंगल परिसरात इकडे तिकडे वाघाचा शोध करत असतांना वाघांनी परत येऊन एका निखिल उईके (२०) राहणार नंदीखेडा याला जखमी केले तेव्हा  सोबत असलेल्या लोकांनी आरडाओरडा करून वाघाला हाकलून लावले व जखमी  युवकास  जंगला बाहेर आणले.

अशा परिस्थितीत वन कर्मचाऱ्यावर हल्ला करून मारहाण करणे व शासकीय कामात अडथळा आणणे हा एक गुन्हा आहे.  लोकांनी अशा वेळेस शांतता राखून वन कर्मचाऱ्यांना सहकार्य केल्यावरच वाघांच्या बंदोबस्त करता येईल व परिस्थिती सांभाळण्यास सोपे जाईल. तेव्हा अशा वेळेस लोकांनी कायदा सुव्यवस्था हातात घेऊन दंगा करण्या ऐवजी त्यांना सहकार्य करावे –  ‘स्वाब नेचर केअर संस्थेच्या अध्यक्षांनी वनसमाचार च्या प्रतिनिधीला म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here