मोहर्ली वनपरिक्षेत्रातील देवाडा गावात वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार : सरपण गोळा करणे महागात पडले

0
399

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग ):
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पतर्गत येत असलेल्या मोहर्ली वनपरीक्षेत्रातील देवाडा बिटातील कक्ष क्र.165 मध्ये सरपण गोळा करण्यासाठी गेली असता  अचानक जवळ असलेला वाघाने  हल्ला करून जागेच ठार केले असल्याची घटना आज दि.28 मे 2024 रोजी दुपारी 2.00 वाजतांच्या सुमारास उघडकीस आली.

 प्राप्त माहितीनुसार मृतक चंदा जंगलाच्या दिशेने सरपण गोळा करण्याकरिता गेली असता अचानक समोरून येत असलेल्या वाघांना बघून परत गावाच्या दिशेने दावत सुटली असता पायामध्ये सलवारचा दुपट्टा अडकल्याने ती खाली पडली व त्यात क्षणी वाघाने तिच्यावर हल्ला केला व जागीच ठार केले असल्याची माहिती समोर येत आहे.

सदर घटनेमध्ये मृतकाचे नाव सौ. चंदा राजेश्वर चिकराम वय 32 वर्ष रा. देवाडा ता. भद्रावती जि. चंद्रपूर असे आहे.सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच मोहर्ली वनपरीक्षेत्र  अधिकारी संतोष थिपे, मोहर्ली (प्रादेशिक), वनपाल एस.जुमडे, दुर्गापूर पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक लता वाढीवे, प्रभाकर चौहान, खेडेकर, प्रवीण मुळे व डोंगरे  तसेच क्षेत्रीय वनरक्षक यांच्या समक्ष मौका पंचनामा करून मृतकाचे प्रेत शवविच्छेदन करण्याकरिता जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे नेण्यात आले आहे. वन विभागा तर्फे मृतकाचा पती राजेश्वर वाघू चिकराम  यांना तातडीची मदत म्हणून 50000 रु  देण्यात आले व तसेच घटना स्थळी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहे. ग्रामस्थांना जंगलात जाण्यास सक्त मनाई करण्यात आले असून व तसेच वन्यप्राण्याच्या हल्यापासून बचाव करण्याकरिता जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले आहे. व पुढील तपास मोहर्ली वनपरीक्षेत्र  अधिकारी संतोष थिपे, मोहर्ली (प्रादेशिक) करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here