घोडाझरी अभयारण्यात आपसी झुंजीत वाघाचे मृत्यू

0
906

यश कायरकर:

ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत, नागभिड वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या घोडाझरी अभयारण्यात आज दिनांक 28 फरवरी 2022 रोजी सकाळच्या सुमारास एक वयस्कर नर वाघाचा मृतावस्थेत आढळला.
वाघाच्या शरिरावरील जख्मा पाहता दोन वाघाच्या झुंजीत या वाघाचे मृत्यू झाले असावे असे प्राथमिक अंदाज आहे. मृत वाघ हा याच परिसरात वावरनारा (T-11) हा वाघ 13 वर्षे वयाचा पुर्ण विकसित नर वाघ असल्याचे कळले आहे.


घोडाझरी अभयारण्यातील बफर क्षेत्रातील कक्ष क्र.582 हुमा बिटात सदर घटना काल दिनांक 27 फरवरी 2022 रात्रीच्या सुमारास घडली असल्याचे निदर्शनास आले आहे. वाघाचे मृत्यू 12 तास पुर्वी झाले असल्याची संभावना आहे. संबंधित मृत वाघाचे शवविच्छेदन हे घटनास्थळी करन्यात आले, व घटनास्थळी जाळण्यात आले.
यावेळी पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. गिरीश गभने नागभीड, पशुधन विकास अधिकारी डॉ. शिरीष रामटेके, बायलाजीस्ट राकेश आहुजा ब्रम्हपुरी, वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड नागभीड, झेप संस्थेचे अध्यक्ष पवन नागरे नागभीड, इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here