जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):
ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी अंतर्गत येणाऱ्या तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रामध्ये गेल्या 12 जुलैला वाघाने तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत गंगासागर हेठी नियत क्षेत्रातील,उश्राळा मेंढा रीट परिसर गट क्रमांक 2 संरक्षित वनक्षेत्र परिसरात , शेतावर काम करायला गेलेली आकापुर येथील श्रीमती देवता जीवन चनफने वय 42 वर्ष, या महिलेला वाघाने ठार केले होते. मात्र त्यानंतर वनविभागाने लोकांना त्या वाघाला तात्काळ पकडण्याची ग्वाही देत वाघ पकडण्याची मोहीम राबवण्यास सुरुवात केली मात्र दहा दिवस उलटूनही अजूनही वाघ हा वनविभागाच्या हाती लागला नाही. मात्र त्या परिसरामध्ये दोन-तीन दिवसांपूर्वी वाघाने दोन गायी ठार केल्यामुळे परिसरात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले व त्या परिसरातील शेतकरी एवं शेतमजूर हे शेतावर निघण्यास घाबरून राहिले होते व त्यामुळे त्या परिसरातील शेतीचे काम खोळंबलेली असून जर वनविभागाने तात्काळ त्या वाघाला पकडून कायमस्वरूपी बंदोबस्त केला नाही तर मात्र आता शेतकऱ्यांचा व परिसरातील ग्रामीण लोकांचा संयमाचा बांध तुटेल व परिसरातील संपूर्ण गावातील लोक ही लवकरच तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्र कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढतील असा इशारा देत सरपंच महा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा उश्राळा (मेंढा) गावचे लोकनियुक्त सरपंच ‘हेमंत लांजेवार’ यांनी ठामपणे पत्रकारांना सांगितले.
विशेष म्हणजे तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रात स्थायी स्वरूपाच्या दोन वर्षांपासून वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. सोनाली कडनोर ह्या असूनही त्यांनी अंदाजे तिन ते चार महिनेच तळोधी वनपरिक्षेत्रात उपस्थित राहून कार्यभार सांभाळला मात्र त्यानंतर त्या प्रसूती रजा, बाल संगोपन रजा, आणि आता प्रशिक्षणाच्या नावाखाली तळोधी वनपरिक्षेत्रातून दिसेनासे च झालेल्या आहेत. त्यामुळे तळोधी बाळापुर या अती संवेदनशील वनपरिक्षेत्राची धुरा ही सध्या इकडून तिकडे, एकमेकांकडे चार्ज देत या वाऱ्यावर फिरत आहे. या ठिकाणी कोणताही स्थायी वनपरिक्षेत्र अधिकारी उपस्थित नसल्यामुळे अशी संघर्षाची स्थिती निर्माण होऊन निर्माण झालेली आहे. मात्र ही स्थिती कर्मचाऱ्यांनी हाताळण्याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्याचा साथ नाही की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आणि जर वरिष्ठ लेवल वरचे अधिकारीही जर याकडे गांभीर्याने लक्ष देत नसतील तर मात्र आता आमच्या संयमाचा बांध तुटून जन आक्रोश मोर्चा काढावा लागेल असा घणघणीत शब्दात हेमंत लांजेवार यांनी इशारा दिलेला आहे.
“आमच्या परिसरात बाईला वाघाने ठार मारले त्यानंतर दहा दिवसानंतर परत पुन्हा त्याच शेत शिवार परिसरामध्ये वाघाने दोन गाईंना ठार मारले . त्यामुळे आमच्या परिसरात शेतकर्यां मध्ये मोठी दहशत निर्माण होऊन, शेतीचे काम खोळंबली आहेत. जर वनविभागाला या वाघाला पकडायचे असते तर वाघाने दोन गाईला मारले तेव्हा योग्य पद्धतीने सापळा रचून वाघाला बेहोशीचे इंजेक्शन देऊन जेरबंद करता आले असते.
मात्र वनविभागाने असे केले नाही त्यामुळे त्यांची भूमिका ही संशयित आहे. तर आता आम्हालाच परिसरातील लोकांना जन आक्रोश मोर्चा घेऊन तळोदी वनविभागाचे ऑफिसवर धडकावे लागेल.”
– हेमंत लांजेवार, सरपंच उश्राळा (मेंढा) तथा अध्यक्ष सरपंच महा सेवा संघ चंद्रपूर जिल्हा.
“महिलेच्या मृत्यूस कारणीभूत वाघ हा अनोळखी असुन बाहेरून आलेला आहे, त्या वाघाला पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे आणि तसे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अचानक पडलेल्या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे, वाघाला पकडनण्यात अडचणी निर्माण होत आहेत. आमची रेस्क्यू टिम त्या परिसरात सक्रिय आहे. परिसरातील नागरिकांनी सहकार्य करावे.”
– विशाल सालकर, वन परिक्षेत्र अधिकारी (अतिरीक्त कार्यभार) , वन परिक्षेत्र तळोधी (बा.)