ताडोबा मधील छायाचित्र सोशल मीडियावर वायरल होत असलेला पर्यटकांनी वाघाचा रस्ता अडविले असल्याचा फोटोमुळे वनविभागात खळबळ

0
553

चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):
जग प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये दिनांक 17 मे 2024 रोजी ताडोबाच्या कोर क्षेत्रा मधील सकाळ फेरी दरम्यान चीजघाट ते कुंबी टॅंक परिसरात रोमा नामक वाघीण रस्त्याने चालत असलेला दूर अंतरावरून काढलेला छायाचित्र सोशल मीडियामध्ये वायरल झाले असल्यामुळे वन विभागामध्ये  खळबळ उडाली आहे.
तसे बघितले तर कोर्टामध्ये देखील छायाचित्रच्या आधारावर एखाद्याला शिक्षा दिली जात नाही. पण वन अधिकाऱ्यांनी सदर घटनेची पूर्णपणे चौकशी न करता मोजके काही गाईड व ड्रायव्हर यांना एक महिन्याकरिता निलंबित करण्यात आले  असल्याची माहिती समोर आली आहे व तसेच  एका क्रुझर गाडीच्या ड्रायव्हरला नेहमीसाठी निलंबित करण्यात आले आहे.

सदर घटनेच्या छायाचित्रा मध्ये दिसत असलेले सर्व गाईड व ड्रायव्हरची चौकशी न करता लगेच एका महिन्याकरिता निलंबित करणे योग्य आहे का असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये चर्चे द्वारे समोर येत आहे.
ताडोबा मध्ये  वर्षांवर्षी काम करत असलेले पर्यटक मार्गदर्शक व ड्रायव्हर यांच्यावर विश्वास  करून  वनविभाग  त्यांना सतत प्रशिक्षण देऊन सफारी करिता जिप्सीवर पाठवितात. एकाच वेळेस एवढे गाईड व ड्रायव्हर चुका करू शकतात का?  ते  पण जे ताडोबा चे उत्कृष्ट गाईड म्हणून सम्मान प्राप्त असलेले आहे. याविषयावर त्यांच्याशी संवाद न साधता निर्णय देणे  योग्य आहे का ? अशी देखील चर्चा सर्वत्र सुरू आहे.


वाघ आणि जीप्सी मध्ये एक योग्य अंतर ठेवून पर्यटक व्याघ्र दर्शन करतात. पण व्याघ्र दर्शन करत असताना बरेच वेळा ताडोबा मध्ये वाघ जिप्सीचा जवळ येतो. अशा वेळी जिप्सी रोडच्या खाली केल्यास व जीप्सी रिव्हर्स घेतल्यास गाईड व ड्रायव्हर वर  कारवाई करण्यात येते. मग अशा वेळेस काय करायचे असा प्रश्न देखील समोर येत आहे. लाखो रुपये खर्च करून व्याघ्र दर्शनाकरिता आलेल्या पर्यटकांना त्यांच्या डोळ्यासमोर दिसत असलेला वाघ न दाखवता  जिप्सी जंगला बाहेर काढले तर पर्यटक गेटवर येऊन तक्रार करतात.


यासंदर्भात ताडोबाचे पर्यटक मार्गदर्शक शहनाज बेग यांच्याशी संवाद साधल्यास ते म्हणाले की, “आम्ही गाईड पर्यटन दरम्यान सर्व नियमाचा पालन करूनच एक योग्य अंतर ठेवून  पर्यटकांना वाघ दाखविण्याचा प्रयत्न करतो. या सर्व प्रकारणात असे लक्षात येते की, आंतरराष्ट्रीय दर्जेवर असलेल्या ताडोबाला बदनाम करण्याकरिता हे छाया चित्र प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ताडोबातील सर्व गाईड व जिप्सी ड्रायव्हर यांच्या उदरनिर्वाह पर्यटनावर अवलंबून असल्यावर  ते नियमाचा उल्लंघन करणार नाही हे माझी खात्री आहे. सदर घटनेमध्ये दिसत असलेला छायाचित्र एका वेगळ्या अँगलने घेऊन वाघाला डिस्टर्ब होत असल्याचे जाणून दाखविण्यात आलेले आहे असे मला वाटते. तसेच यावर सखोल  चौकाशी करावी व भविष्यात असे होणार नाहीं याची सुद्धा काळजी घेण्यात यावे असे मला वाटते.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here