
यश कायरकर :
तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत आलेवाही बेटातील वाढोणा येथील बंडू बळीराम बोरकर यांच्या जर्षि गोऱ्याला बिबट ने दि 27/05/2021 ला पहाटे 2.30 वाजताच्या दरम्यान गुरांच्या गोठ्यात जखमी केले. यावेळी जवळच फक्त ७ फुट अंतरावर खाटेवर घर मालक झोपलेले होते. मात्र बिबट्याने त्यांना कुठलीही इजा न करता फक्त गाईच्या वासरालाच जख्मी केले. वासराची आरडा ओरड ऐकून मालकाने बिबट्याला हाकलून लावले.
घटनेची माहिती मिळताच सकाळी पी. एम. गायकवाड वन रक्षक आलेवाही बीट, के.डी.गरमडे क्षेत्र सहाय्यक तळोधी यांनी मोक्का पंचनामा केला.
