
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या मोहर्ली गावात जनावरांमुळे घाणीचे सम्राज्य व दळण वळणास अडथळा दिसून येत आहे.
मोहर्ली गावात जनावरे दिवस-रात्र रोडवर आणि गावात मोकाट सुटलेले आहे त्यावर कोणाचेच लक्ष नाही
ताडोबा सफारी करिता मोहर्ली गावात देश-विदेशातून पर्यटक येतात व मोहर्ली मध्ये स्टे करतात
भारतात तसेच विदेशात पण ताडोबाचा नाव प्रख्यात आहे अशा वेळेस रोडवर जनावर बसून असल्यामुळे येण्या-जाण्याचा खूप त्रास होत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गावातील रस्त्यावरून फिरताना शेना व मलमुत्रामुळे गावात खूप दुर्गंध पसरलेली असून घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे.
तरी पण याकडे मोहर्ली ग्राम पंचायतचे दुर्लक्ष होत आहे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांचे व कार्यकर्त्यांचे देखील लक्ष नाही.
या मोठ्या जनावरांना आडा घालण्यासाठी कोंडवाड्याची सुविधा नाही जे जागा कोंडवाड्यासाठी होती तिथे वन विभागाने कायाकिंग बोटिंग शुरू केले त्यामुळे कोंडवाड्यासाठी जागा शिल्क नाही कोंडवाडा नसल्याने जनावर मोकाट रात्र दिवस फिरत आहे तसेच कोंडवाडा नसल्यामुळे मोहर्ली ग्राम पंचायतीचे आर्थिक नुकसान होत आहे. बरेच अधिकारी ताडोबा सफारी करिता येतात पण गावातील या दुर्गंधी कडे कोणी लक्ष देत नाही. या जनावराना राखण करण्यासाठी गुराखी नाही तेव्हा त्या जनावरांच्या मालकांनी याची माहिती दिलेली असताना सुद्धा ते याकडे दुर्लक्ष करत आहे. तेव्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे असे मोहर्ली ग्रामस्थांची मागणी आहे.
