चंद्रपूर : ताडोबा अंधारी टाइगर रिझर्वच्या (बफर) क्षेत्रातील मोहर्ली गावात “एक गाव, एक गणपती” ह्या संकल्पनेत मोहर्लीचा वनराजा गणेश मंडळ समाजातील सर्वधर्मीय समानतेचे चित्र प्रतिबिंबित करते.
रिसोर्ट मालक, जिप्सी मालक-चालक, पर्यटक मार्गदर्शक व तसेच मोहर्ली,आगरझरी, देवाडा, आडेगाव, जुनोना, भामडेळी, सितारामपेठ, कोंडेगाव, मुधोली आणि टेकाडी यांच्या एकत्रित प्रयत्नातून “एक गाव एक गणपती” या संकल्पनेतून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
रोटरी क्लब चंद्रपूर व मोहर्ली वनराजा गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले व तसेच मोहर्ली वनराजा गणेश मंडळा तर्फे कबड्डी स्पर्धा, व्हॉलीबॉल स्पर्धा, नृत्य स्पर्धा, भजन स्पर्धा, व्यसनमुक्ती शिबिर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतावर आधारित स्वावलंबी व स्वच्छ गाव निर्माण करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास हजारो ग्रामस्थांनी सहभागी होऊन लाभ घेतला व तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ततास्तू रिसोर्टचे कर्मचारी, ईरइ रिसोर्ट नॅचरलिस्ट, पर्यटक मार्गदर्शक, जिप्सी ड्राइवर, वन कर्मचारी व मोहर्ली ग्रामस्थ असे एकूण 100 लोकांनी आज दि.26 सप्टेंबर 2023 रोजी रक्तदान केले.
सदर कार्यक्रमास यशस्वी करण्याकरिता सहकार्य करणारे मोहर्लीचा वनराजा गणेश मंडळाचे अध्यक्ष संजय मानकर, उपाध्यक्ष मोहर्ली सरपंच सौ.सुनीता कातकर, सचिव मोहम्मद सुलेमान बेग व समस्त गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य संरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर) एस.आर. थिपे, क्षेत्र सहाय्यक एस.डी. जुमडे, एस.एल. बालपणे, पी.पी. ढाले, वनपाल डी.एम. चौधरी, एस. एफ. वाळके, वनरक्षक कु. एम.टी. बुरडकर, एस. एम. मंगाम, व्ही. के. जनबंधू, ए.के. राठोड, बी. एम. गोधने, एस. आर. पेद्दीवार, पी.पी. देरकर, कुमारी.व्ही. वाय. कातकर, कुमारी टी.के. काळे, ए.एन. ताजणे, एच. बी.भट, आर.एन. धनविजय, गेट मॅनेजर अजय कोंडापे, निखिल चुनारकर, प्रवीण आत्राम, अमित झरकर, सुनील येडमे, राजू चिकराम, वनमजूर व तसेच मोहर्ली गावचे पोलीस पाटील रामकृष्ण साखरकर, माजी उपसरपंच राजू ढवडे, गणपतीच्या आरतीकरिता सहकार्य करणारे सौ. वंदना शेंडे व त्याची चमू यांनी मोलाचे सहकार्य केले.