
बल्लारपूर:
मनोरा वन शिवारात महादेव काशीनाथ बोभाते वय (४३) हा शेळकी बकऱ्या चराईसाठी गेले असतांना अस्वलाने अचानक हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना उपक्षेत्र मानोरा , नियक्षेत्र मानोरा -2 मधील कक्ष क्र. 450 मध्ये घडलेली आहे.
सदर परिसरातील डी .एस . बावणे , क्षेत्र सहाय्यक मानोरा , व कु .आर . ए . मुन वनरक्षक यांना गस्ती दरम्यान माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थीपे यांनी आपल्या टीम सोबत घटनास्थळी हाजर झाले. तात्काळ पाहणी करुन जखमी महादेवला खाजगी वाहना ने प्राथमिक उपचारा करिता ग्रामिण रुग्नालय बल्लारशाह येथे दाखल केले .त्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्नालय चंद्रपुर येथे दाखल करण्यात आले .
या गंभीर बाबीची दखल घेत जख्मी महादेव काशीनाथ बोभाते यांना वनविभागा मार्फत १० हजार रुपये तात्काळ आर्थिक सहाय्य देण्यात आले.
सदर परिसरात वनविभागा मार्फत गस्ती वाढविण्यात आली आहे व ग्रामस्थाना वनामध्ये जाण्यास सख्त मनाई करण्यात आली आहे .
