
- वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दोन बिबट्या मृतावस्थेत सापडले.
- दोन बिबट्यांना काही ग्रामस्थांनी विष देऊन ठार मारल्याचा आरोप
नांदेड :
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तहसील मध्ये अज्ञात गावक्यांनी 2 बिबट्यांना ठार मारल्याच्या घटना उघड़किस आली. बिबट्यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्यांवर हल्ला करून ठार केले होते.गावकऱ्यानी विषबाधा करून बिबट्यांना ठार केल्याची घटना तल्लारी-जलकवाडी वनक्षेत्रातील शेतामध्ये दोन्ही बिबट्या मृतावस्थेत आढळले.
दिनांक 21 एप्रिल बुधवारी एका बिबट्यांचा मृतदेह सापडला तर दुसऱ्या बिबट्यांचा मृतदेह 25 एप्रिल शनिवारी आढळला असे औरंगाबादचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) पी. के. महाजन यांनी सांगितले की प्राथमिक तपासणीनुसार दोन बिबट्यांना विषाने ठार मारण्यात आले. स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यानी असा दावा केला आहे की त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या मृत्यूनंतर अज्ञात ग्रामस्थांनी दोन्ही बिबट्यांना विष प्राशन केले. पी के महाजन म्हणाले, “बिबट्यांनी या भागातील काही पाळीव कुत्र्यांचा बळी घेतला. त्यामुळे गावकऱ्यांनी दोन बिबट्यांना विष प्राशन केल्याचे म्हटले जात आहे.
मृत बिबट्यांपैकी एक नर तर दुसरा मादा होती. दोन्ही बिबट 2-3 वर्षांच्या होत्या. वन विकास महामंडळ (एफ.डी.सी.एम) लिमिटेड चे विभागीय व्यवस्थापक एस एच वाजे यांनी सांगितले की, दोन बिबट्यांच्या मृत्यू संदर्भात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. पुढील तपास शुरू आहे.
