
चंद्रपूर (मोहम्मद सुलेमान बेग):
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मुधोली बिटात दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 4.00 वाजताच्या सुमारास सौ. लक्ष्मीबाई रामदास कन्नाके रा. टेकाडी (दीक्षित) वय अंदाजे (60) वर्ष पोस्ट मुधोली तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर मौजा टेकाडी (दीक्षित) येथील शेत शिवारातील शेतात काम करीत असताना अचानक एका वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली.
सदर घटनेची माहिती वन विभागाला होतास वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, कीटे सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भद्रावती, क्षेत्रीय वनरक्षक जनबंधू, वनपाल गणेश गायकवाड व पोलिस पाटील सुभाष झाडे घटनास्थळी दाखल झाले व त्यांच्या समक्ष मौका पंचनामा करून मृतकाचे शवविच्छेदन करण्यास ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे नेण्यात आले.
सदर घटनेत ठार केलेल्या लक्ष्मीबाई यांच्या मुलगा काशिनाथ रामदास कन्नाके यांना घटनास्थळी तात्काळ मदत स्वरूपात रक्कम रुपये 50,000 देण्यात आले.
सदर परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले असून ग्रामस्थांना शेतीचे काम करताना वन्य प्राण्यांपासून सावध राहण्याची सूचना वन विभागाद्वारे देण्यात आली. असून, पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली संतोष थिपे हे वरिष्ठांचा मार्गदर्शनानुसार करीत आहेत.
