पळसगाव (जाट) येथे अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती कार्यक्रम

0
361

(सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या वतीने अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती व स्वाब संस्थे चे मार्गदर्शन)

सिंदेवाही:
एकीकडे विज्ञानाने प्रगती करत भारताने चंद्रावर पाऊल ठेवले , तर दुसरीकडे आपल्या समाजात रुचत असलेली अंधश्रद्धा फोफावतच चाललेली आहे. समाजासाठी घातक ठरत असलेली हीच अंधश्रद्धा समाजातून नष्ट करण्याकरता शेकडो वर्षांपूर्वी आपल्या देशातील संतांनी प्रयत्न केले. त्यानंतर येत्या ४० वर्षापासून  अ.भा.अंधश्रध्दा निर्मुलन समिती अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करीत आहे.


आज ‘मेरी माटी मेरा देश‘ अंतर्गत सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या विद्यमानाने पळसगाव (जाट) येथील भारत विद्यालयात ‘अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती’ कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून  बोलताना
“भूत- भानामती, करणी – जादूटोणा, राशिभविष्य, ग्रहदशा हे सर्व आपल्याला भीती दाखवून पैसा कमवायला ढोंगी बुवा बाबांनी रचलेले शब्दांचे खेळ असून, यात गुरफटक जाऊन समाजाची व परिवाराची हानी करू नका. विज्ञानाने भरारी घेत मंगळ – चंद्रावर पावले ठेवली. मात्र अंधश्रद्धेमुळे आपली पावले स्मशानाकडे वळत आहेत, फक्त समाजाचेच नाहीतर जंगल आणि पर्यावरणाचे ही मोठे नुकसान होत असल्याचे सांगून, अंधश्रद्धा सोडा समाज आणि देश बलवान बनवा!” असे प्रमुख मार्गदर्शक यश कायरकर, नागभीड तालुका संघटक अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती  व अध्यक्ष स्वाब नेचर केअर संस्था यांनी सांगितले.
प्रस्तावना शिक्षक कमलाकर कामठी, तर आभार ठिकरे शिक्षक यांनी केले.
यावेळी सिंदेवाही पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद बावने, व पोलीस ह. शंकर राऊत, रोषण धोतरे (wpsi), ‘स्वाब’ संस्था चे सदस्य जिवेश सयाम, छत्रपती रामटेके, विनोद लेनगूरे, नितीन भेंडाळे, विकास लोनबले, अमन करकाळे, भोलेनाथ सुरपाम, आकाश मेश्राम, शुभम निकेशर , अक्षय फुलझले हे तर भारत विद्यालय पळसगाव जाट चे संपूर्ण शिक्षक, व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here