मुंबई : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण नगर येथील रेड सँड बोआ’ तस्करी करणाऱ्यां टोळीना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ५ आरोपीला अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार जादूटोणा आणि मर्दानी शक्तीच्या अंधश्रद्धेमुळे एक दुर्मिळ साप प्रजाती संकटाशी झुंज देत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा दुर्मिळ प्रजातीच्या सापाची सुटका करण्यात आली आहे. जप्त केलेल्या सापांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 70 लाख आहे.
रेड सँड बोआ सापाचे डोके आणि शेपूट दोन्ही सारखेच दिसतात म्हणूनच त्याला दोन तोंडी साप देखील म्हणतात. हा साप भारत, इराण आणि पाकिस्तान मध्ये आढळतो. सदर प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.