
यश कायरकर (जिल्हा प्रतिनिधी) : नव्याने काही वर्षांपूर्वी घोषित झालेला घोडाझरी अभयारण्य हा घोडाझरी तलावाच्या सौंदर्यामुळेच जास्त प्रचलित आहे.
*काय ती झाडी ? काय तो डोंगर ?काय तो होटील ?सब कुछ ओके च.* असलेले इंग्रज कालीन घोडाझरी तलाव, सात बहिणी डोंगर, आणि छान घनदाट जंगल यांनी वेढलेला. वाघ, बिबट ,अस्वल, चांदी अस्वल, चितळ, सांबर, निलगाय, रानगवे,सारखें प्राणी , नवरंग, स्वर्ग नर्तक, चित्र बलाक, घुबड, गरुड , सारखे पक्षी, घोरपड,नाग, अजगर, सारख्या सरिसृप वन्यजिवांनी समृद्ध. घोडाझरी अभयारण्य लवकरच प्रसिद्धीच्या झोतात आला.
नागपूर व चंद्रपूर वरुन जवळपास ११० – १०० कि.मी. असल्या समान अंतरावर असलेल्या घोडाझरी ला जाण्याकरता दोन प्रवेशद्वार बनवण्यात आले. एक नागभीड – चंद्रपूर रोडवर मुख्य प्रवेशद्वार हा मुख्य मार्गालगत तर दुसरा खडकी गावाजवळ असलेला प्रवेशद्वार नागभीड- चंद्रपूर मार्गावरील चिंधी (चक) फाट्यावरून किटाळी- हुमा- खडकी गावावरून जातो. ज्यांच्या मधून पर्यटक या अभयारण्यात ये जा करतात. या अभयारण्यात इंग्रज कालीन बंगल्यामध्ये एक रिसॉर्ट पण आहे. व तेथे लहान मुलांसाठी गार्डन व पर्यटकांसाठी बोटिंग व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सुद्धा ये जा करण्याकरता हेच दोन रस्ते वापरले जातात.
पावसाळ्यात मुबलक पाऊस पडला की घोडाझरी तलाव शतप्रतिशत भरून त्याच्या सांडव्यावरून वाहू लागतो. आणि तेव्हा मात्र या तलावाचे आणि परिसराचे सौंदर्य अधिकच खुलते. आणि या निसर्गसौंदर्याचा, तलावाच्या सांडग्यातून ओसंडून वाहणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आनंद लुटण्याकरता संपूर्ण विदर्भातून शेकडो नाही तर हजारो पर्यटक घोडाझरी तलावाला सुट्टीच्या दिवशी भेट देतात. ह्या सांडव्यातून वाहणारा पाणी असेपर्यंत दर रविवारला हजारो पर्यटक हा आनंद लुटण्या करता येतात. कालही पाचशेच्या वर चार चाकी वाहने व हजारो दुचाकी वाहने घेऊन पर्यटन घोडाझरी आनंद लुटण्याकरता आले. या पर्यटकांमुळे व्यवसाय करण्याकरता आसपासच्या गावातील काही लोक घोडाझरी मध्ये आपली खाण्याची दुकाने सुद्धा थाटून बसतात. मात्र या गर्दीमुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना खूप मोठी तारेवरची कसरत करावी लागते. पर्यटकांना सांभाळण्याकरता त्या परिसरातील नागभीड वन क्षेत्रातील काही वन कर्मचारी व दोन्ही गेट सांभाळणारे गेटवरचे चौकीदार हेच असतात. व काही अनुचित घटना होऊ नये म्हणून आपले सर्व कामे सोडून नागभीड पोलीस दलाला सुद्धा येथे येऊन गस्त करावी लागते.
(अभयारण्य व पर्यावरणातील नियमांची पायमल्ली)
मात्र हजारो लोकांना सांभाळणे हे आवाक्याच्या बाहेर आहे त्यामुळे त्या स्थळावर पर्यटकांमध्ये आपापसात होणारी हाणामारी, त्या वाहत्या पाण्यात फेकल्या जाणाऱ्या दारूच्या रिकाम्या बाटल्या, तेथे असलेल्या नाश्त्याच्या दुकानदाराद्वारे कचऱ्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे जंगल परिसरात इकडे तिकडे पसरणारा प्लास्टिक कचरा, सायंकाळी दुकान बंद करून जाताना दुकानात आणि बाजूला दुकान च्या समोर झालेला प्लास्टिक कचरा ते दुकानदार सहजच त्या सांडव्याच्या वाहून जाणाऱ्या पाण्यामध्ये विसर्जित करतात. त्यामुळे तो त्या पाण्याद्वारे आजूबाजूच्या जंगलात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा पसरत आहे.
घोडाझरी अभयारण्यात जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी ठरवलेल्या वेळेच्या बंधनाची सुद्धा स्थानिक अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पायमल्ली केली जाते. सकाळला आठ नंतरच प्रवेश व सायंकाळ ला पाच वाजता च्या आधी गेटच्या बाहेर येणे हे अनिवार्य असून सुद्धा व जंगलात वाघांचे वावर असून सुद्धा नागभीड येथील काही हौशी अधिकाऱ्यांचे संबंधी हे रोज सकाळी निवड तलावात पोहण्याचा आनंद लुटण्याकरता बळजबरीने पाच सात गाड्या घेऊन पहाटे पाच ते सहा च्या दरम्यान रोजच या अभयारण्यातुन तलावात जातात. त्यावेळेस वाघाचा भ्रमणतिचा वेळ असल्यामुळे कोणतीही अनुचित घटना होण्याची संभावना नकारता येत नाही. व त्यांना गेटवरील लोकांनी अडविल्यास अधिकाऱ्याद्वारे त्यांना प्रवेश देण्याकरता दबाव आणला जातो.
दिवसा जाणारे पर्यटन हे सायंकाळी सहा व सात कधी आठ वाजेपर्यंत सुद्धा जंगलाच्या बाहेर येत नाही. तसेच अभयारण्यातील रस्त्यांवर थांबणे किंवा आजूबाजूला जंगलात जाण्याची परवानगी नसताना सुद्धा काही पर्यटक रानभाजी तोडण्याकरिता, तर काही मुलं मुलींना घेऊन रोमान्स करन्या करिता, तर काही जेवणाची पार्टी करण्याकरता जंगलामध्ये अनाधिकृत व जीव धोक्यात घालून प्रवेश करतात. कोणत्याही जंगलामध्ये ड्रोन चा वापर करण्याची परवानगी नसताना सुद्धा. या ठिकाणी अभयारण्य ड्रोनच्या द्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे ही नित्याची बाब झालेली आहे. याकडे स्थानिक क्षेत्र सहाय्यक यांनी डोळे झाक केली आहे. अशा प्रकारच्या नियमांना तोडून जंगलात प्रवेश केल्यामुळे लवकरच मोठी दुर्घटना होणे ची शक्यता, असून याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे व घोडाझरी अभयारण्य की पर्यटन स्थळ ? हे एकदाचे ठरवून सुनियोजित करणे अत्यंत आवश्यक आहे. व पर्यटन स्थळ जरी असेल तरीही तो धार्मिक स्थळ नसल्यामुळे काही बंधन लादणे हे काळानुरुप अत्यंत महत्त्वाचे आहे. काही वन्यजीव प्रेमी संस्था द्वारे याबाबत प्रश्न निर्माण करून आक्षेप सुद्धा घेण्यात येत आहे.
” घोडाझरी हा अभयारण्य घोषित करण्यात आलेला असून, घोडाझरी तलावा करिता येणाऱ्या पर्यटकांद्वारे होणारी गर्दी व नियमांचे उल्लंघन यामुळे अभयारण्याचे कुठलेही नुकसान होऊ नये व अभयारण्यातील वन्यजीवांना कुठलाही त्रास होणार नाही नियमांचे पायमल्ली होणार नाही याकरिता होणाऱ्या पर्यटनावर वन विभागाने नियंत्रण ठेवून अभयारण्याची काळजी घ्यायला पाहिजे.”
– अमोद गौरकर , ‘तरुण पर्यावरणवादी मंडळ’ शंकरपूर.
“घोडाझरी मध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी अभयारण्याचे भान ठेवून नियमांचे पालन करायला पाहिजे. व इकडे तिकडे प्लास्टिक कचरा फेकू नये, व वन विभागाने या गोष्टीची काळजी घ्यायला हवी, व पर्यटनाच्या वेळेची व नियमांची काटेकोरपणे पालन व्हायला हवे.”
– पवन नागरे, अध्यक्ष ‘झेप’ पर्यावरण संस्था नागभीड
“विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे थोडी अव्यवस्था झाली. मात्र जंगलाचे कुठल्याही प्रकारे नुकसान होऊ नये याकरिता मनुष्यबळ वाढवण्यात येणार असून. घोडाझरी मध्ये येणाऱ्या पर्यटकांना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागतील. आणि आणखी काय करता येईल याकरिता आम्ही वरिष्ठांसी बोलून यावर तोडगा काढू.” हजारे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपरिक्षेत्र नागभीड.
