स्वाब’ संस्थेने दिले विषारी सापांना जीवदान

0
369

तळोधी बा. : तळोधी वन परिक्षेत्रातील कार्यरत पर्यावरण प्रेमीे संस्था ‘स्वाब’ च्या अध्यक्षांनी परिसरातील सहा वेगवेगळ्या विषारी सापांना आज दि. २५ जून २०२२ रोजी जंगलात त्यांच्या अधिवासात सोडून  जीवदान दिले.
सध्या पावसाळ्याच्या दिवसात संपूर्ण परिसरात सापांचे दिसण्याचे प्रमाण आपण सगळीकडे बघतो. कधी कधी तर घरात व घर परिसरात दिसणाऱ्या सापांना पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम हे सर्पमित्र नेहमीच करत असतात.


प्रमुख्याने पावसाळ्या मध्ये पावसाचे पाणी  बिळात गेल्याने व  सुकलेली जागेच्या शोधात साप मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात व घरात घुसतात.
त्यामुळे जीवाच्या आकांताने परिसरातील सर्पमित्रांना लोक बोलविले जातात व  सर्पमित्र जीवाची परवा न करता व शासनाकडून कोणत्याही  प्रकारची मदत न मिळता लोकांच्या मदतीला धावून जातात व सापांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून त्यांचे जीव वाचवण्याचे कार्य करत असतात.
तळोधी बा. परिसरात स्वाब संस्थेचे अध्यक्ष, सर्पमित्र  यश कायरकर यांनी अशाच प्रकारे आलेल्या फोन कालवर  आपले कर्तव्य समजून परिसरातील वाढोणा, वलनी, कन्हाळगाव, सावरगाव अशा वेगवेगळ्या गावांमधील  सापांना पकडून त्यांची तळोधी वनविभागात नोंद करून परिसरातील जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले.

जंगलात सोडण्यात आलेले विषारी नाग, घोणस, मण्यार व  बिनविषारी धामन, या  सापांना आज पर्यावरण मुक्त करण्यात आले. यावेळी तळोधीचे वनरक्षक एस. बी. पेंदाम, श्रेयश कायरकर, दिपक बारसागडे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here