
सातारा
मौजा विंग तालुका कराड गावाचा शिवारात ऊसाच्या शेतात काही लोक शिकारी कुत्र्याच्या सहायाने शिकार करत असल्याची आज दिनांक 25 एप्रिल रोजी गुप्त माहितीच्या आधारे कराड येथील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले व शिकारी यांचा पाठलाग करत एका विहिरी जवळ सर्व 10 ते 12 शिकाऱ्यांना अडविले. तपासणी केली असता त्याच्या जवळ नर व मादा असे 2 ऊद मांजरचा मृत आढळुन आले. त्यांच्या सोबत 7 शिकारी कुत्री होते. सर्व आरोपीना लगेच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सर्व आरोपी मौजा ओड तालुका कराड येथील आहेत.
आरोपींची नावे बबन बापू देशमुख वय 40, बाळू काळु जाधव वय 45, पोपट आप्या देशमुख वय 40, राहुल शिवाजी पवार वय 23, सुनील राजाराम देशमुख वय 25, अजय राजाराम देशमुख वय 23, शिवाजी बापू देशमुख वय 38, रघूनाथ आप्या देशमुख वय 37, राजाराम बापू देशमुख वय 42 या सर्व आरोपींना ऊसाच्या शेतामध्ये कुत्र्याच्या मदतीने ऊद मांजराची शिकार केली. त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 44, 48(अ) व 59 अन्वये तसेच भारतीय जैवविविधता अधिनियम 2002 अन्वये 7, 55 व 58 अन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास भगत सिंह हाडा , उपवनसंरक्षक सातारा, किरण कांबळे सहाय्यक वनसंरक्षक ( वनी व कॅम्पा) सातारा यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल पाटण विश्वास काळे, मानत वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल मलकापूर स. वानखेडे, वनरक्षक मलकापूर रमेश जाधव, वनरक्षक नांदगाव अरुण साळुंकी, वनरक्षक शेजोली सौ. सुनिता जाधव व इतर कर्मचाऱ्यांनी कारवाई केली व पुढील तपास सुरू आहे.
