
चंद्रपुर:
चेकबोर्डा ते चेकनिंबाळा रस्त्यावर काही अज्ञात वाघाचे अवयव विक्री करिता येणार असल्याचे गुप्त माहिती दिनांक 23 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास बफर चंद्रपूर याचे पथकांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता चेकबोर्डा गावा पासून 500 मीटर अंतरावर 4 इसम दिसले त्यांची तपासणी केली असता त्यांच्या कडून एका छोट्या बॅग मध्ये वाघाचे दात 4 नग, वाघाची नखे 12 नग व वाघाच्या मिश्या 15 नग हस्तगत करण्यात आले त्यानुसार आरोपी रमेश गोसाई टेकाम, रा. म्हातारदेवी 52 वर्ष, सूर्यकिरण धोंडुजी अलाम, रा. चेकबोर्डा वय 45 वर्ष, भारत मुकाजी बावणे, रा. सुशी, वय 45 वर्ष, लिंगो मुकाजी बावणे, रा. सुशी, वय 43 वर्ष, यांना ताब्यात घेऊन तपासणी करिता वनपरिक्षेत्र कार्यालय चंद्रपूर येथे आणण्यात आले. अधिक तपास केले असता त्यांनी सदर वाघाची अवयव मौजा चेकनिंबाळा येथून जीवनदास प्रभाकर मडावी, रा.चेकनिंबाळा वय 20 वर्ष व नामदेव मारुती आत्राम यांच्या कडून अंदाजे 3 वर्षापूर्वी घेतले असल्याची माहिती मिळाली.
या प्रकरणी सर्व आरोपींना अटक करून माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी, चंद्रपूर यांचे कोर्टात हजर करण्यात आले.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास डॉ. जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, जी. गुरुप्रसाद उपसंचालक बफर यांचे मार्गदर्शनाखाली बी.सी. येडे, सहाय्यक वनसंरक्षक, सौ. स्वाती महेशकर, वनपरिक्षेत्र अधिकारी बफर चंद्रपूर, एम. ए. नवघरे, क्षेत्र सहाय्यक, पी.एस. झाडे क्षेत्र सहायक व परिक्षेत्रातील इतर कर्मचारी करीत आहेत.
