
माहूर :
माहूर तालुक्यातील मछिंद्र पार्डी शिवारात मोतीराम जोधा राठोड यांच्या शेतात दि.22 एप्रिल गुरुवार रोजी पहाटेच्या सुमारास बिबट मृत अवस्थेत आढळून आला होता. सदर प्रकार विष प्रयोगाने घडल्याची चर्चा शुरू होती.
सदर घटनेची तपास दरम्यान वनविभागाला मिळालेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र पारडी येथील शेतात दिनांक 20 एप्रिल मंगळवारी रात्री शेतात धान्याच्या कोठारात दोन बैल, एक गाय आणि एक बैल बांधले होते.
कुत्र्यांच्या हल्ला झाल्याचे गृहीत धरून मृत बैलावर कीटकनाशक फेकले आणि त्याला जुन्या विहिरीत टाकले होते असे अटक केलेल्या प्रकाश जगनलाल जयस्वाल वय 54 यांनी कबूल केले.
आरोपीवर दिवाणी व फौजदारी न्यायालय माहूर येथे याबाबत सुनवाई होऊन चार दिवसाची वन कोठडी देण्यात आली. तपासामध्ये विषप्रयोग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 9, 39 व 51 अन्वये वन्यप्राण्यांना नुकसान पोहोचविणे व त्याची हत्या करणे या आरोपाखाली गुन्हा नोंदविण्यात आला व पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी बी पी आडे व त्यांचे सहकारी करीत आहे.
