कार अपघातात बिबट्याचा मृत्यू तीन दिवसांनी सुटली वास

0
1596

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली पद्मापूर मार्गाच्या बाजूला कारच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त होत आहे रविवारी ज्या ठिकाणी भरधाव कारने झाडाला धडक दिली त्याच ठिकाणी थोड्या अंतरावर मृत्यू बिबट्या आढळला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा चे महत्त्वाचे गेट असलेल्या पद्मापूर गेट पासून 500 मीटरच्या अंतरावर काल दिनाक 21 मार्च रोजी रात्री 9.30 च्या सुमारास MH34 BR 6979 या कार ने झाडाला जोरदार धडक दिली.या अपघाता मध्ये  दोन पर्यटक गंभीर जखमी झाल्याची माहिती असून पद्मपुर गेट इंजार्च धमके मॅडम यांनी घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपले दोन मदतनीसला घटनास्थळी  पाठविले आणि अपघातात जखमी झालेल्याना दुसऱ्या कार ने उपचारासाठी  रुग्णालयात पाठविले तसेच आपल्या वरिष्ठ अधिकारी सदर अपघाताची सूचना दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अपघात ग्रस्त कार ही बल्लारपूर येथील रजत परमार यांची असून त्यांच्या सोबत दोघे अपघाताच्या वेळेस कारमध्ये होते.
हा अपघात एवढा जोरदार होता की कार ने धडक दिलेल्या झाडाची फांदी कार च्या पुढील भागवर तूटून पड़ली त्यामुळे कार चा पुढील भाग चपकुन गेला तसेच अपघात स्थळा पासून काही अंतरावर डिक्स चे टुकड़े आढळून आले या वरुन असे लक्षात येथे की सदर कार ही किती अनियंत्रित वेगात होती.
सदर अपघाताने पुन्हा एकदा  मद्यधुंद पर्यटकामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवाचा सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे यावर सुद्धा ताडोबा प्रशासनाने विचार  करने गरजेचे आहे.
मोहर्ली पद्मापूर मार्गाच्या बाजूला बिबट्या मृतावस्थेत आढळला रविवारी या ठिकाणी भरधाव  कार नेे झाड़ाला धडक दिली त्याच ठिकाणी थोड्या अंतरावर मृत बिबट्या आढळला आहेत तीन दिवसांनी या भागात दुर्गंधी पसरल्यावर बिबट मेल्याची सुगावा मिळाला यावरून त्या कारचे धडक देऊन बिबट्या मारल्याचा संशय व्यक्त होत आहे. वन्यजीवांची मोठी  वर्दळ असलेल्या मोहर्ली मार्गावर मद्यधुंद पर्यटक वाहनाच्या अतिवेग वन विभागासाठी चिंतेचे बाप बनली आहे अशी टीका ग्रामस्थांनी वन समाचार च्या प्रतिनिधी कडे व्यक्त केली.

सदर वाहनाच्या धडकेत एखाद्या वन्यजीवास  जबर दुखापत  झाली असण्याची शक्यता सर्वप्रथम वन समाचार ने दर्शविले होती वर्तवली होती.

वन पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृत बिबट्याचे पोस्टमार्टम करण्यात आले.
यावेळी सहाय्यक वनसंरक्षक येडे, वनपरिक्षेत्र अधिकारी मून, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे, डॉ. कडूकर, डॉ. रवींद्र खोबरागडे, डॉ.पोदाचलवार आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here