चंदगड काॅन्झर्वेशन रिझर्व्ह’मध्ये पट्टेरी वाघाने केली शिकार

0
503

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड संवर्धन राखीव वनक्षेत्रात वाघाचा अधिवास आढळून आला आहे. नुकताच या वनक्षेत्रात वाघाने शिकार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या दक्षिणेकडील वनक्षेत्रांमध्ये वाघांचा अधिवास असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ हा दक्षिणेकडील कर्नाटक मधील अन्शी दांडेली , भीमगड ,महाराष्ट्रातील तिलारी,दोडामार्ग,आजरा बुदारगड,चंदगड , विशालगड मार्गे उतरेत चांदोली व कोयना पर्यंत भ्रमण करीत असतो.


डिसेंबर, २०२० मध्ये राज्य सरकाराने ५ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या ‘आंबोली-दोडामार्ग काॅन्झर्वेशन रिझर्व्ह’ आणि २२ हजार ५२३ हेक्टर क्षेत्रावरील ‘चंदगड काॅन्झर्वेशन रिझर्व्ह’ची घोषणा केली होती. त्यापूर्वी २९.५३ चौ.किमीच्या तिलारी काॅन्झर्वेशन रिझर्व्हची स्थापना झाल्याने या भागातील वन्यजीवांचा भ्रमणमार्ग जोडण्यासाठी मदत झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या तिन्ही संवर्धन राखीव वनक्षेत्रांमध्ये वाघांचा अधिवास आहे. आंबोलीत यापूर्वी वाघांच्या पावलांचे ठसे आणि त्याने केलेल्या शिकारीचे अवेशष मिळाले आहेत. लाॅकडाऊनच्या काळातही आंबोली परिसरात नर वाघाचे छायाचित्र हे वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाले होते. आता तिलारी आणि आंबोलीच्या वनक्षेत्रांनी जोडलेल्या चंदगड कॉन्झर्वेशन रिझर्व्हमध्ये वाघाचा वावर निदर्शनास आला आहे.
नुकताच याठिकाणी वाघाने रेड्याची शिकार केल्याची माहिती वन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. वाघ हा रेड्याला झुडपांमध्ये जवळपास १०० फुट फरफटत घेऊन गेला आणि त्याठिकाणी रेड्याला खाल्याची छायाचित्रे समोर आली आहेत. शिवाय तिथे वाघाच्या पायाची पदचिन्हे देखील सापडली आहेत. त्यामुळे वाघाच्या अधिवासावर शिक्कामोर्तब झाले असल्याल्चे *चंदगडचे परिक्षेत्र वनाधिकारी नंदकुमार भोसले* म्हणाले. काॅन्झर्वेशन रिझर्व्हच्या निर्मितीमुळे वाघांचा भ्रमणमार्ग जोडला जाऊन तो संरक्षित झाल्याचा हा परिणाम आहे असेही भोसले ह्यांनी सांगितले.

वाघ आणि इतर मोठ्या सस्तन प्राण्यांसाठी कॉरीडोर कनेक्टिव्हिटी (भ्रमणमार्गाची जोडणी) अतिशय महत्त्वपूर्ण आहे. दक्षिणेकडील कर्नाटक मधील अन्शी दांडेली , भीमगड ,महाराष्ट्रातील तिलारी, दोडामार्ग, आजरा बुदारगड, चंदगड, विशालगड मार्गे उतरेत चांदोली ,कोयना ते जोर जांभळी पर्यंत भ्रमण करीत असतो हे अभासावरून दिसत आहे व हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अतिशय सकारात्मक आहे.

गिरीश पंजाबी
व्याघ्र संशोधक – वाईल्डलाईफ कोन्झेर्वेषण ट्रस्ट

तिलारी संवर्धन राखीव, चंदगड संवर्धन राखीव, दोडामार्ग आंबोली संवर्धन राखीव, छत्रपती शाहू महाराज आजरा-बुदरगड संवर्धन राखीव, गगनबावडा संवर्धन राखीव, पन्हाळगड संवर्धन राखीव विशाळगड संवर्धन राखीव , हे एकीकडे राधानगरी वन्यजीव अभयारण्याला लागून आहेत तर एकीकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या चांदोली राष्ट्रीय उद्यान व कोयना अभयारण्य व पुढे जोर जांभळी संवर्धन राखीव पर्यंत सलग लागून आहेत.  भ्रमणमार्ग अखंड ठेवल्याने प्रजनन क्षेत्रातील वाघ व इतर तरून भक्षी प्राणी हे त्या क्षेत्राला जोडणाऱ्या इतर जंगलात आणि संरक्षित वन क्षेत्रात स्वत:चा स्वतंत्र अधिवास निर्माण करु शकतात हे अधोरेखित होते.

डॉ. व्ही. क्लेमेंट बेन भा.व.से.
मुख्य वनसंरक्षक -कोल्हापूर

कोयना वन्यजीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्य या आधीच युनेस्कोने जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहेत आणि बर्डलाइफ इंटरनॅशनलने महत्त्वाचे पक्षी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे, हे जगातील जैवविविधतेने समृद्ध असे महत्वाचे स्थान ठरले आहे. लवकरच लुप्त होण्याच्या धोका असलेल्या व केवळ याच भागात आढळणाऱ्या वनस्पती, प्राणी, पक्षी, व इतर प्रजाती यांनी हा प्रदेश समृद्ध आहे  ही वस्तुस्थिती लक्षात घेता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाची ( स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स ) मंजूरी खूप दिवसांपासून प्रलंबित आहे. म्हत्वाचे म्हणजे राज्यात व भारतात इतर सर्व व्याघ्र प्रकल्पात स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स मंजूर व त्तैनात आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दलाची तैनाती लवकरात लवकर शासनाने करावी आणि संपूर्ण प्रदेश विशेष वाघ संरक्षण दलाच्या संरक्षण आणि रक्षणाखाली आणल्यास वन्यजीव गुन्हेगारी आणि बेकायदेशीर बॉक्साईट खाणकाम नियंत्रित करण्यात मोठी मदत होईल तर स्थानिकांना व्याघ्र संरक्षण दलात नोकऱ्या मिळतील.

रोहन भाटे
मानद वन्यजीव रक्षक सातारा तथा
सदस्य वन्यजीव अपराध नियंत्रण बुरो
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here