“गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी परिसरात नुकताच काही वर्षांपासूनच वाघांचा संचार निदर्शनास येत असुन तीन दिवसांपूर्वी रामाळा परिसरात एका 60 वर्षीय महिलेला टी-13 वाघिने ने ठार केल्याची घटना उघडकीस आली होती.
यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. यावेळी नागरिकांनी वाघास जेरबंद करण्याची मागणी देखील केली होती. वनविभागाने त्याच दिवसांपासून वाघीनीच्या हालचाली वर लक्ष ठेवले होते.
त्या करिता कॅमेरा ट्रॅप लावुन अवघ्या तीन दिवसात वाघिणीला जेरबंद करण्यार आले व त्या वाघीनीला गोरेवाडा TTC इथे नेण्यात येणार असून वाघिणीला जेरबंद केल्याने नागरिकांनी एकच निश्वास सोडला आहे.
पण खरंच हा सुटकेचा विश्वास आहे का खरंच हा वाघीणीला किंवा वाघाला जेरबंद करणे हा त्यावरील उपाय आहे का.? हा एक पर्मनंट समाधान आहे का ? की फक्त तात्पुरता..?
मात्र, जंगल आहे तर तिथे वाघ राहणारच वाघांचे घटते अधिवास आणि नवीन अधिवासाच्या शोधात चंद्रपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्हा, या चारही जिल्ह्यातील जंगलात, ताडोबा, करांडला किंवा नागझिरा या व्याघ्र प्रकल्प परिसरातील परिवारापासून दूर झालेले नवीन वाघ हे नवीन अधिवास शोधण्याच्या प्रयत्नात इतरत्र भटकत असतात आणि जिथे त्यांना मुबलक जागा मिळते त्या ठिकाणी जाऊन ते स्थावर होतात (गडचिरोली जिल्ह्यात यापूर्वी जास्त प्रमाणात वाघांची संख्या नसल्याने तो संपूर्ण जिल्ह्यातील जंगल हा या वाघांसाठी एक चांगला दिवस ठरू शकते) मात्र तेथेही वाघ स्थिरावत नाही त्यामागचे कारण म्हणून जे तर त्या ठिकाणी वाघांच्या अस्तित्वासाठी पुरेसे उपलब्ध नसलेले भोजन म्हणजे.. तृणभक्षी प्राणी उदाहरणार्थ सांबर चितळ यासारखे प्राणी यांची संख्या नाही बरोबर असल्यामुळे तिथे गेलेले वाघ हे जंगलाच्या आत मध्ये स्थिरावू शकत नाही व ते जंगलाच्या बाहेरच्या इलाक्यात शिकार शोधण्यात, शेताच्या आसपास, गावाचे आसपास भटकू लागलेले आहेत आणि त्यातही त्या परिसरामध्ये यापूर्वी वाघांचे अस्तित्व नसल्यामुळे लोकांना तिथे नक्षलवाद्यांसोबत मिळून मिसळून राहण्याची सवय झाली आहे मात्र, वाघ/बीबट सारख्या प्राण्यांच्या सराव नसल्याने त्यांच्यासोबत जगणे त्यांकरिता कठीण झालेले आहे*
एका इकडे ‘ताडोबा’ सारख्या ठिकाणी शेकडो वाघ आहे. मात्र त्याचा एक पाव भाग ही अख्या गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या संख्येचा नसूनही, तुलने मध्ये चंद्रपूर पेक्षा जास्त ‘मानव वन्यजीव संघर्षाच्या व त्यामध्ये मानव यांची जीवित हानी होण्याच्या’ घटना ह्या गडचिरोली जिल्ह्यात जास्त घडत आहेत. या मागचा कारण म्हणजे.. त्या परिसरातील असलेल्या लोकांचा वाघांबद्दलचा ‘अज्ञान’ मात्र जर एखादी दुर्दैवी घटना घडली तर नागरिकाकडून व लोक प्रतिनिधीं कडून त्या वाघाला किंवा वाघिणीला जेरबंद करण्याची मागणी केली जाते आणि त्या दबावात येऊन वन विभागाला ना ईलाजाने परिसरातील संबंधित वाघ, वाघीण ,बिबट ,अस्वल सारख्या प्राण्यांना पकडून स्थानांतरित करावे लागते. मात्र हा प्रकारचा दुर्दैवी घटनांवर कुठल्याही प्रकारचा पर्मानंट उपाय नाही. कारण त्या परिसरातील वाघांना जेरबंद केल्यानंतर ती रिकामी जागा, झालेली पोकळी पुन्हा दुसरा कोणता तरी वाघ त्या जागेवर येऊन भरून काढेलच आणि संघर्ष हा अविरतपणे चालूच राहील. मात्र हा संघर्ष टाळण्यासाठी सतत ‘वाघ पकडा, वाघ पकडा!’ असे रेटून धरून वाघांना जेरबंद करून त्यांचे स्थानांतरण करणे हा यावरचा कधीच उपाय असू शकत नाही. तर परिस्थितीची जाण लक्षात ठेवून आपल्याला त्यांच्या सोबत कसे जगता येईल ? आणि मानव वन्यजीव संघर्ष कसा टाळता येईल ? या गंभीर प्रश्नांकडे ही वनविभागच नाही तर परिसरातील लोक आणि लोक प्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. जेणे करून ‘जंगल, वन्यजीव आणि मानव’ हे तिन्ही आप आपल्या ठिकाणी सुरक्षित जगू शकतील.
– ✍️ यश कायरकर,
वन्यजीव अभ्यासक, अध्यक्ष ‘स्वाब नेचर केअर संस्था’