
लाखनी : शिंधी लाईन लाखनी प्रभाग क्र.8 मध्ये शंकर हारोडे यांच्या राहत्या घरी खूप मोठा घुबड असल्याची सूचना फोनद्वारे वनविभागाचे के.एस.सानप बिट वनरक्षक, लाखनी यांना सकाळी 9.00 वाजताच्या सुमारास देण्यात आली.
सदर घटनेची माहिती मिळताच के.एस.सानप बिट वनरक्षक व वन्यप्रेमी (सर्पमित्र) मयूर गायधने, लाखनी हे त्वरित गाडीने हारोडे यांच्या घरी पोहचले व त्यांनी तिथं बघितलं एक युरेशियन गरुड-घुबड घुबडांच्या सर्वात मोठ्या प्रजातीं पैकी एक असलेला घुबड त्यांना जिवंत दिसला.
युरेशियन गरुड-घुबड संध्याकाळ आणि पहाटे सुमारास सक्रिय असतात आणि जेव्हा ते उडतात तेव्हा फ्लाइट शांत असते. हे दिवसाच्या दरम्यान एकटे किंवा जोड्यांमध्ये प्रामुख्याने आढळतात.
सदर घटनेची माहिती त्यांनी बिट वनरक्षक शहारे मॅडम व नितीन उशीर यांना दिली व त्याला पकडुन क्षेत्र सहाय्यक लाखनीच्या स्वाधीन केले. त्यांनी मौका पंचनामा व मेडिकल करून सायंकाळी त्या घुबडाला त्याचा जंगल परिसरात सोडून दिले.
सदरचे रेस्क्यु मध्ये बिट वनरक्षक शहारे मॅडम व नितीन उशीर, के. एस. सानप आणि सर्पमित्र विवेक बावनकुळे यांनी सहकार्य केले.
