(गोठ्यात शिरुन एका आठवड्यात 17 शेळ्या ठार केले) (परिसरात ग्रस्त लोकांना बाहेर न झोपण्याचा सल्ला)
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):
सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत शिंदेवाही येथे बिबट्याने गोठयात शिरुन चार शेळ्या आणि पाच बकरे ठार केल्याची घटना गुरुवार (दि.२०) च्या मध्यरात्री घडली. ही घटना शुक्रवार (दि. २१) च्या सकाळी उघड़कीस आली. विशेष म्हणजे दोन दिवसात परिसरातील ही दूसरी घटना व आठवड्यातील तिसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. व वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी लोनवाहीतील नागरिकांकडून केली जात होती. घटना स्थळ परीसरात
ट्रॅप कॅमेरे,पिंजरा लावण्यात आले व नंतर त्याच पिंजर्यात शुक्रवार च्या रात्रो एक बिबट पकडण्यात वन विभागाला यश आले.
नगर पंचायत हद्दीत तहसील कार्यालयाच्या मागे ५० ते ६० घरांची जूनी लोनवाही झोपडपट्टी परिसर लागून आहे. तर जवळच जंगल सुद्धा लागून आहे. या परिसरात मागील काही दिवसांपासुन वाघ, बिबट यांंचा वावर वाढला असल्याने नागरीकात भिती आहे. अनेकांना वाघ, बिबट या परिसरात दिसून आले आहे.
मंगळवार (दि. १८) च्या मध्यरात्री बिबट्याने गोठयात शिरुन रवि अमृत ढोलने यांच्या मालकीचे पाच शेळ्या ठार केल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतांना पुन्हा गुरुवार (दि. २०) च्या मध्यरात्री गणपत महादेव कुंभरे यांच्या घरच्या गोठयात शिरुन बिबट्याने चार शेळ्या आणि पाच बकरे ठार केले होते.
यानंतर लोकांच्या मागणी व परिश्ररातील परिस्थिती पाहता वन विभागाने त्या बिबट्याला पकडले. व यामुळे परिसरातील जनतेने जरी मोकळा श्वास सोडला असेल तरी आणखी काही बिबट परिसरात असल्याच्या अफांमुळे नागरिकात भीती असून वनविभागाची डोकेदुखी वाढलेली दिसत आहे.