
यश कायरकर :
ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत तळोधी वनपरिक्षेत्रात दिनांक 21 मई 2021 रोजी क्षेत्रीय कर्मचारी गस्त करीत असताना वाघीण G1 लंगड्या असल्याचे दिसून आले व दोन ते तीन दिवसापासून एकाच ठिकाणी बसून असल्याने ती अशक्त अवस्थेत होती.
सदर वाघिणीला वैद्यकीय उपचारार्थ जेरबंद करने हेतू विरिष्ठा कडून परवानगी मागण्यात आली व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांनी वाघिणीला जेरबंद करण्यास परवानगी दिली.
जेरबंदीची परवानगीने मिळताच जखमी वाघीण G1 ला दिनांक 21 मई 2021 पासून मोहीम राबविण्यात आली व तिला पकडण्यास दिनांक 24 मई 2021 यश मिळाले.
वाघीण G1 ला जेरबंद करण्यास योग्य व निश्चित स्थानी तळोधी वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र गोविंदपुर क्षेत्र कच्चेपार कक्ष क्रमांक 68 मध्ये सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी, RRT ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांची उक्त वाघीणस डॉट मारून बेशुद्ध करून पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. वाघिणीचे वय अंदाजे 2 ते 2.5 वर्ष आहे.
सदर वाघिनीचे वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे व तिला गोरेवाडा प्राणी संग्रहालयात व बचाव केंद्र, नागपूर येथे हलविण्यात आले.
या वेळेस वनविभागाचे क्षेत्रीय अधिकारी / कर्मचारी तसेच RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर चे सदस्य यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.
