आठवडाभरात  3 अजगरासह, 1 उदमांजर व 6 नागांना दिले जीवदान (स्वाब संस्थेच्या सर्पमित्रानी दिले जीवदान)

0
427

चंद्रपूर :  या आठवड्यात सिंदेवाही वनपरीक्षेत्रातील राजुरी  जवळील विरवा येथे 35 कि.मी. अंतरावरील कोंबडी फार्म मध्ये घुसुन कोंबडी व  अंडे खाऊन असलेल्या एका अजगराला पकडून,  सिंदेवाही वनपरिक्षेत्रात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले व  आलेवाही येथील कासी
व केवाळा तलावात मच्छी मारांच्या जाळ्यात लटकलेल्या दोन अजगरांना सुरक्षित सोडवून 3 तीन अजगरासह,1 एक उदमांजर व 6 नागांना जीवदान दिले.


त्यापैकी आलेवाही येथील केवाळा तलावातील  मच्छीमारांच्या जाळ्यात लटकून जख्मी झालेल्या अजगराला सिंदेवाही येथील  पशुवैद्यकीय दवाखान्यात   पशुसंवर्धन अधिकारी कु. शालिनी लोंढे यांनी उपचार करून सुरक्षित स्थळी सोडून जीवदान दिले. तसेच उश्राळा मेंढा येथील सरपंच हेमंत लांजेवार यांच्या गोठ्यात 2 नाग सापांना व परिसरातील इतर 4 असे एकूण 6 सहा नाग सापांना पकडून  तळोधी बा. वनपरिक्षेत्र कार्यालयात नोंदणी करुन जंगलात सुरक्षित सोडून जीवदान दिले.


त्याच सोबत सावरगाव येथील श्रीराम बोरकर यांच्या घरात घुसलेल्या उदमांजर (Civet cat) ला पकडून गावाबाहेर जंगलात सोडून जीवदान दिले. अशा प्रकारे या पावसाळ्यात एकूण 10 अजगरांना व 7 च्या वर नाग सापांना व 1 उदमांजरीला  सुरक्षित ठिकाणी सोडले.


स्वाब संस्थेच्या सर्पमित्र सदस्यांनी कौतुकास्पद कार्य केले. ‘स्वाब’ वन्यजीव क्षेत्रात उत्कृष्ट करत आहे.


सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील अजगराला सोडताना डोंगरगाव चे वनरक्षक चहांदे, कच्चेपार चे वनरक्षक चौधरी  हे उपस्थित होते.  तर केवाळा तलावात  जाळ्यात अडकलेल्या जखमी अजगराला सिंदेवाही येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय उपचार करून सुरक्षित ठिकाणी सोडताना  तळोधी बा. चे वनरक्षक पेंदाम, तर काही तलावातील जळात अडकडलेल्या अजगर सापाला सोडताना क्षेत्र सहाय्यक गरमाडे, वनरक्षक पेंदाम, वनमजूर उईके हे उपस्थित होते.
विशेष म्हणजे  सततच्या पावसामुळे व नद्यांना आलेल्या पुरांमुळे अजगरांची संख्या परिसरात जास्त आढळून येत आहे. या पावसाळ्यातील याच परिक्षेत्रातील तलावातील मच्छी माराच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या  जाळ्यात अडकलेल्या  एकुण 10 दहा अजगरांना व  इतर विषारी बिनविषारी अशा विविध 64 सापांना ‘स्वाब’ संस्थेचे सदस्य/ सर्पमित्र जीवेश सयाम, महेश बोरकर, यश कायरकर, हितेश मुंगमोडे,  वेदप्रकाश मेश्राम, यांनी या वेगवेगळ्या ठिकाणी पकडलेल्या सापांची वनविभागात नोंद करून त्यांना सुरक्षित सोडून जीवदान दिले. त्यांच्या या कार्याबद्दल वनविभाग व परिसरातील लोकांद्वारे कौतुक केलं जातं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here