
चंद्रपूर : (मोहम्मद सुलेमान बेग)
नागभीड तालुक्यातील आलेवाही गाव तलावाच्या सांडव्यावर मच्छीमारांनी लावलेल्या जाळात अडकलेल्या साडेसात फूट लांबीच्या अजगराला ‘स्वाब’ संस्थेच्या सदस्यांनी आज दि.२३ ऑगस्ट २०२२ रोजी अजगर सापाला जीवदान दिले.
मच्छीमार जाळे तपासण्यास गेले असता एक मोठा अजगर साप अडकला असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी सर्पमित्रांना या संदर्भात माहिती दिली. माहिती मिळताच स्वाब संस्थेच्या सर्पमित्रांनी आलेवाही तलावातील अडकलेल्या अजगर सापाला सुरक्षितपणे पकडून त्यानंतर त्याला त्याच जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून दिले.
यावेळेस कच्चेपार चे वनरक्षक चौधरी, आलेवाही चे वनमजूर उईके, पी. आर. टी . सदस्य सचिन रामटेके, सिद्धार्थ सुखदेवे हे तर संस्थेचे अध्यक्ष व सर्पमित्र कायरकर, महेश बोरकर, हितेश मुंगमोळे, प्रतिकार बोरकर, व मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष उपस्थित होते.
विशेष म्हणजे या पावसाळ्यातील याच महिन्यात मच्छीमाराच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जाळ्यात अडकलेल्या 7 अजगरांना व व्यवस्थित सोडवून संस्थे मार्फत जीवदान देण्यात आले . तर इतर विषारी बिनविषारी अशा विविध 58 सापांना ‘स्वाब’ संस्थेच्या सदस्य/ सर्पमित्रांनी त्यांचे प्राण वाचवून जीवदान दिले. त्यांच्या या कार्याबद्दल वनविभाग व परिसरातील लोकांद्वारे कौतुक केलं जातं आहे. ‘स्वाब’ संस्थेचे काम कौतुकास्पद आहे. घोडाझरी परिसरातील स्वच्छता असो, मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाला मदत असो किंवा सापांना रेस्क्यू करणे असो सदैव’ स्वाब’ संस्थेच्या सदस्य तयार असतात.
