हस्तानपुर येथील इसमाचा आकस्मित मृत्यू

0
246

तळोधी (बा.) यश कायरकर :
तळोधी बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील हस्तानपुर येथील वासुदेव महागुरू जुमनाके (60) हा काल सायंकाळी आपल्याच शेत शिवारातील मोहाच्या झाडाचे खाली मृतावस्थेत आढळला .
सविस्तर वासुदेव महागुरू जुमनाके (60) सरपण गोळा करायला जातो म्हणून दुपारला अकरा वाजता घरून गेला होता मात्र सायंकाळपर्यंत परत आला नाही म्हणून त्याच्या नातेवाईकांनी शेताकडे पाहीले असता वासुदेव चा मृतदेह त्याच्या शेतात शिवारातील मोहाच्या झाडा जवळ पडलेला आढळून आला . त्यांनी प्रथम दर्शनी वाघाने मारले म्हणून आले त्या परिसरातील बिटातील वनरक्षक पी.एम. गायकवाड यांना सुचील केले. घटनेची माहिती मिळताच पी.एम. गायकवाड यांनी घटनास्थळ गाठून प्राथमिक चौकशी केली असता त्यांना वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तशी माहिती तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी के.आर. धोंडणे यांना दिली. तळोधी बाळापूर पोलीस स्टेशन ठाणेदार आर. यस. खैरकर यांना तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी तर्फे सूचित करण्यात आले. व वनक्षेत्र सहाय्यक के. डी. गरमडे, वनरक्षक एस.बी.पेंदाम हे पोलीस तळोधी बाळापुर पोलीस सोबत घटनास्थळी पोहोचले. व मोक्का पंचनामा करून शव विच्छेदन करिता ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे शव पाठविण्यात आला.
घटनास्थळी मृतकाच्या डोक्याला मागच्या बाजूने खोल जखम होऊन मेंदूचा भाग दिसत होता. प्रथम दर्शनी चक्कर येऊन पडल्याने किंवा झाडावरुन दगडावर पडल्याने डोक्याला लागून जखम होऊन मेल्याची शक्यता तळोधी पोलिसांनी प्राथमिक चौकशीत वर्तवली.
मात्र झाडाची कुठलीही फांदी तुटली नसल्याने तो झाडावरून पडला असल्याचे निदर्शनास येत नाही. व जर तो चक्कर येऊन पडलेला असेल तर तीन इंची आकारमान असलेला छोटासा दगड त्याच्या डोक्यात मेंदू पर्यंत घुसेल काय ? आणि हे आकस्मित मृत्यूच आहे काय? असेही प्रश्न परिसरात चाललेले आहेत . तळोधी बाळापुर ठाणेदार आर.एस.खैरकर हे स्वतः सीआरपीसी 174 नुसार गुन्हा दाखल करून पुढील सविस्तर तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here