‘वाघोबा येई गावा, जरा सांभाळून रावा.!’

0
345

जिल्हा प्रतिनिधी (यश कायरकर):

तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रात सुरू असलेली सध्याची परिस्थिती हेच म्हनायला बाध्य करत आहे  ‘वाघोबा येई गावा, जरा सांभाळून रावा’
गेल्या काही काळापासुन  तळोधी बिटातील ओवाळा, लखमापूर,सावंगी, तळोधी, सावरला, सावरगाव व आलेवाही बीटात वाढोणा, खरकडा, आलेवाही,  जीवनापूर, या गावालगत वाघ व बिबट्याचे होणारे दर्शन. आणि यातूनच उद्भवत जाणारी परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे ‌ आणि त्यात भर म्हणून आमच्या वृत्तपत्रातील, सोशल मीडिया वरील वास्तविकता, व सत्य परिस्थिती न समजता दहशत निर्माण करनार्या बातम्या, लेख यामुळे तळोधी (बा) वनविभागाची डोकेदुखी  आणि लोकांमध्ये भिती सुध्दा वाढतच चालली.  त्यातच सुरू झालेला परिसरातील जंगलात सुरू असलेले शासनाची कामे, यापरिसरातील वन्यजीवांच्या  भ्रमंती मार्गावर रात्रंदिवस सुरू असलेली नियमबाह्य गोसेखुर्द कालव्याचे काम, जंगलात  तेंदूपत्ता तोडने, मोहफूल गोळा करण्याचा सीजन, वाढत्या गॅसच्या किंमतीमुळे जंगलात जाऊन सरपण गोळा करणं सामान्य परिवाराला भाग पडतं आहे. यामुळे लोकांचे  जंगल परिसरात हस्तक्षेप वावर वाढत चालले आहे.
अशा परिस्थितीमध्ये वाघ, बिबट्या व अस्वल यांचे दर्शन हे जंगलात झाले तर त्याबद्दल तेवढी भिती आणि कुतूहल लोकांमध्ये नसतोच आणि वनविभागाला ही त्या संदर्भाने काळजी करणे किंवा ती डोकेदुखी ही नसतेच.
मात्र परिसरात सुरू असलेले शेतीचे काम, उन्हाळी धानाची फसल आणि खरीप हंगाम या करिता शेतावर गेलेल्या शेतकऱ्यांना किंवा शेतमजुरांना जेव्हा शेतात किंवा शेतालगत – गावालगत वाघ, बिबटे यांचे दर्शन होने, शेतामध्ये वाघांचा मुक्त संचार दिसने, गावांमध्ये रात्र बिबट्यांचा धुमाकूळ सुरू असने, परिसरात शेतीतील वाघ बिबट्या चे वास्तव व लोकांमध्ये भीती, व त्यात कोणती दुर्घटना होऊ नये म्हणून वन विभागासाठी नक्कीच डोकेदुखी वाढली आहे.  त्यातही तळोधी वन परिक्षेत्रात असलेली वन कर्मचाऱ्यांची अत्यल्प संख्या आणि शासकीय कामासोबतच वाघ बिबट्यांच्या बंदोबस्ताची मागणी आणि त्याकरिता रात्रंदिवस ची धडपड खरंच ही वनकर्मचारी करिता तारेवरची कसरतच ठरत आहे.
वाघ जंगल सोडून गावालगत,  शेतालगत का येत आहेत ? याबद्दलची कारणमीमांसा होणे अत्यंत आवश्यक आहे. वणवा लागून जळलेले जंगल परिसर, जंगलातील आटलेले पाणवठे, जंगलात सध्या सुरू असलेले शासकीय काम, लोकांचे तेंदूपत्ता तोडणे, मोहफुल वेचण्यासाठी धुडगूस, त्यांच्यासोबत जंगलात जाणारे पाळीव प्राणी उदाहरणात गाया, बैल, शेळ्या, कुत्रे आणि त्यांच्या मागोमाग गावांमध्ये येणारे बिबट, व जंगलात डिस्टर्ब होऊन शेताच्या दिशेने निघून आलेले तृणभक्षी वन्यप्राणी उदाहरणात डुक्कर, सांबर, चितळ, नीलगाय, आणि त्यांच्या मागोमाग  पाणी आणि हिरवळीच्या शोधात येनारे वाघ, बिबट तसेच या परिसरात असलेल्या बोकडोह नाल्यात आलेले व नाल्यात आश्रय घेऊन फिरणारे काही वाघोबा. मात्र यावर काय उपाय करता येतील ? हे फक्त विचार करून चालणार नाही तर परिसरातील लोकांत या संदर्भात जागृती पसरवून, सावधानता बाळगणे बाबतचे उपाय सुचवून, त्यांच्या मनातील भीती दूर करून, त्यांच्या सुरक्षिततेची भावना निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यांना सांगणे जरुरी आहे ‘वाघोबा येई गावा, जरा सांभाळून रावा.!’
✍️यश कायरकर. (९८८१८२३०८३)
     अध्यक्ष –  स्वाब नेचर केअर संस्था

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here