
चंद्रपुर : चिकाटी, जिद्द व परिश्रमाला दुर्दम्य ईच्छाशक्तीची जोड देत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत बांबू क्षेत्रात विशेषता पुरुष प्रधान अशा बांबूबांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल चिचपल्ली येथील हिरवं सोनं बांबू कारागीर संस्थे तर्फे अन्नपूर्णा धुर्वे यांचा सत्कार करण्यात आला.
अन्नपूर्णा धुर्वे बावनकर या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातून बाबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम बांबू बांधकाम या विशेषीकरण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या असून बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या बांबू बांधकाम प्रकल्प एक मात्र महिला प्रकल्प व्यवस्थापक म्हणून उल्लेखनीय कार्य करीत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात यशस्वी रित्या बांबू बांधकाम प्रकल्प पूर्णत्वास असून त्यांनी या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाला मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुद्धा केले.
अन्नपूर्णा धुर्वे यांनी बांबू टेक ग्रीन सर्विसेस या संस्थेच्या माध्यमातून बांबू उद्योगाची सुरुवात केली असून पुढील काळात प्रशिक्षित बांबू कारागिरांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी बांबूशी संबंधित विविध क्षेत्रात काय करता येईल याचे नियोजन सुद्धा त्या करीत आहेत बांबू क्षेत्रात एक प्रशिक्षित बांबू तंत्रज्ञ म्हणून वैशिष्टपूर्ण कार्य करणाऱ्या अन्नपूर्णा धुर्वे या देशातील एक मात्र आदिवासी महिला आहेत.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन जेष्ठ बांबू मास्टर प्रशिक्षक व हिरवं सोनंचे पदाधिकारी भुजंग रामटेके यांनी केले तर हिरव सोनचे सचिव जेष्ठ बांबू कारागीर निकेश बावणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत मांडवगडे, नैताम गुरुजी, रोशन जुमडे, किशोर मडावी, समीर नैताम, महेश मडावी, घनश्याम टोंगे, रुपेश हजारे, महेश मरस्कोले यांनी परिश्रम घेतले.
