
ताडोबाच्या महत्त्वाचा असलेला मोहर्ली गेट वर एकूण 57 जिप्सी आहेत त्यापैकी 22 जिप्सी बाहेरील शासकीय कर्मचारी रिसॉर्ट धारक यांच्या आहेत यामुळे स्थानिकांचा रोजगारावर संकट निर्माण झालेले आहे त्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना द्वारा आज दिनांक 21 मार्च रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात मोहर्ली येथील स्थानिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात त्वरित तोडगा काढावा आणि योग्य उपाय योजना करून स्थानिक गरजू होतकरू जिप्सी धारक युवकांना रोजगाराची संधी देण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आलेली आहे.
सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा देण्यात आले.
यावेळेस शिष्टमंडळात कैलाश तेलतुंबडे जिल्हा कार्याध्यक्ष, अमोल मेश्राम जिल्हा सचिव, महेंद्र ठाकूर शहर प्रमुख, पप्पी यादव तालुका प्रमुख आदी उपस्थित होते
