तळोधी (बा.) यश कायरकर.
नागभीड वन परिक्षेत्रात नागभीड पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या मिंडाळा बिट नजीक बागल (मेंढा) येथील सदगुरु कृपा राईस मिल चे ताराचे कुंपणात अडकुन बिबट मृत पावल्याची घटना आज उघडकीस आली .मिलमालक विलास गिरीपुंजे यांना सकाळी ही सदर बाब लक्षात येताच त्यांनी वनविभागाला माहिती दिली. लागलीच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मिंडाळा गावाबाहेर असलेल्या सद्गुरू राईस मिल च्या जाळ्यात बिबट अडकून मृतावस्थेत आढळले.बाजूला गावठी डुक्कर सुद्धा मृत अवस्थेत आढळले. त्यामुळे सुरुवातीला बिबट्याने डुकरावर हल्ला करून ठार केले व नंतर डुकराच्या कळपाच्या हल्यात आपला जीव वाचविन्यासाठी जात असताना जाळ्यात बिबट्याचे दोन्ही पाय अडकले त्यामुळे त्याला बाहेर पडता न आल्याने मृत्यू झाला असावा असे प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.. सदर बिबट हा एक ते दीड वर्षाच्या असून मादी आहे. घटनास्थळी बिबट व घटना स्थळापासुन जवळच डुक्कर , दोन्ही मृतावस्थेत होते.
दरम्यान घटनास्थळी उपवनसंरक्षक अधिकारी ब्रम्हपुरी दीपेश मल्होत्रा,सहायक वनसंरक्षक वाकडे,वनपरिक्षेत्राधिकारी गायकवाड,वनरक्षक जीवतोडे, जि.प.सदस्य संजय गजपुरे,मानद वन्य जीव रक्षक विवेक कळंबेलकर,झेप निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ.पावन नागरे,सदस्य क्षितिज गरमळे,गुलाब राऊत, मंगेश फुकट,तुषार गजभे, स्वाब नेचर केअर संस्था’ चे अध्यक्ष यशवंत कायरकर, सदस्य जिवेश सयाम,यांची उपस्थिती होती.
मृत बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेत उत्तरीय तपासणी व शवविच्छेदन करीता वन परिक्षेत्र नागभीड येथे आनन्यात आले. व शवविच्छेदन डॉ. श्री शिरिष रामटेके, पशुसंवर्धन अधिकारी पंचायत समिती ब्रम्हपुरी. डॉ.गिरीष गभने, पशुवैद्यकीय अधिकारी पंचायत समिती नागभीड. डॉ. अस्मिता जगझापे, पशुसर्वचिकीत्सक नागभिड यांनी केले. सविस्तर माहिती वनविभागाच्या वतीने अजुनही पुरविण्यात आली नाही.