चंद्रपूर शहरात एक वृद्ध व्यक्ति आपल्या उपजीवीकेसाठी पोपट पक्षी विक्री करत असताना दिनांक 20 सेप्टेम्बर रोजी सकाळच्या सुमारास आढळून आले, वन्यजीव प्रेमी ने याची माहिती इको-प्रो संस्था कड़े केली. माहिती मिळताच इको-प्रो सर्प संरक्षण विभाग प्रमुख अब्दुल जावेद याने त्वरित घटना स्थळी पोहचुन सदर पोपट पक्षी विक्री करणाऱ्या वृद्ध व्यक्तिला सर्व पोपट पक्षी मुक्त करण्यास सांगितले.
वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार असे कृत्य गुन्हा आहे.
सदर व्यक्ति पोपट विकुन व्यवसाय करित असल्याने त्यास त्याचा उपजीवीके चे साधन असल्याने त्याला काही पैसे देण्यात आले.
मात्र यापुढे पोपट विकताना आढळून आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अशी समज देण्यात आली.