नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटक मार्गदर्शकाचे प्रशिक्षण सिल्लारी व नागलवाडी येथे आयोजित करण्यात आले . पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी, खुरसापार, चोरबाहुली तसेच खुबाळा व सुरेवानी येथील पर्यटक मार्गदर्शक या प्रशिक्षणामध्ये उपस्थित होते.
सदर प्रशिक्षणात पक्षीशास्त्र हा विषय घेण्यात आला असून पक्ष्यांची ओळख, सर्वसाधारण दिसणारे पक्षी, पेंच व्याघ्र प्रकल्पातील पक्षी, येथील वैशिष्ट्यपूर्ण पक्षी तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात दिसणारे गिधाड यासंदर्भात विस्तृत माहिती देण्यात यावेळी देण्यात आली. तसेच मार्गदर्शकांची चाचणी देखील घेण्यात आली.
यावेळेस कार्यक्रमास पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालिका लक्ष्मी मॅडम, उपसंचालक प्रभुनाथ शुक्ल यांनी पर्यटक मार्गदर्शकां सोबत संवाद साधला व तसेच संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रशिक्षण बॉम्बे नॅचरल हिट्री सोसायटीचे सहसंचालक संजय करकरे, संपदा करकरे व अमेय परांजपे यांनी केले व उत्कृष्ट पर्यटक मार्गदर्शकाला पक्षी विषयक पुस्तक देऊन कौतुक करण्यात आहे. तसेच पुढील महिन्यात सस्तन प्राण्यांसंदर्भात प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.