ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व केंद्रीय विद्यालय (WCL) चंद्रपूर यांच्या वतीने योग दिवस संपन्न 

0
443

चंद्रपूर : जग प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली गेट येथे आज दि. 21 जून 2022 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सकाळी 7.00 वाजताच्या सुमारास केंद्रीय विद्यालय (WCL) चंद्रपूर आणि वन विभागाच्या वतीने मोहर्ली गेट येथे योगा करण्यात आला.

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सर्व प्रथम आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची कल्पना मांडली होती. योगमुळे आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो व आपल्या तणावपूर्ण जीवनात मोठा दिलासा मिळतो.
अशा या महत्वपूर्ण दिनानिमित्त ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगांवकर यांनी केंद्रीय विद्यालय (WCL) चंद्रपूरच्या विद्यार्थी, पर्यटक मार्गदर्शक, जिप्सी चालक-मालक यांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमास केंद्रीय विद्यालय (डब्ल्यू सी एल) चंद्रपुर चे प्राचार्य कमल किशोर स्वामी, मोहर्ली गटग्राम पंचायत सरपंच सुनीता कातकर, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (कोर) अरुण गोंड, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (बफर) संतोष थिपे, क्षेत्र सहाय्यक मोहर्ली (कोर) विलास सोयाम, क्षेत्र सहाय्यक  देवाडा वनकर, क्षेत्र सहाय्यक पद्मापूर प्रफुल ढाले, क्षेत्र सहाय्यक आगरझरी भूषण गजपूरे, वनरक्षक पवार, मंदूलवार, देशमुख, पेंद्दीवार, भट, ताजने, मंगाम, टेकाम, कु. महाजन, बुरडकर, जावळेकर व तसेच
केंद्रीय विद्यालय (डब्ल्यू सी एल) चंद्रपुर के  शिक्षक निलेश अंबाडकर, दिलीप मेहता, गिरीश ढवस, कु. श्रद्धा उपाध्याय, केंद्रीय विद्यालय सब स्टाफ राकेश महातव, कर्मचारी अतुल उपरे, सूरज उपरे, मोहर्ली गेटचे समस्त पर्यटक मार्गदर्शक,  जिप्सी चालक-मालक, वनमजुर आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here