
चंद्रपूर :- मुख्य व महाव्यवस्थापक (औषधी वनस्पती) एम. श्रीनिवास रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 18 मे 2022 रोजी एफ.डी.सी.एम. लिमिटेडच्या प्रशासकीय इमारतीतील कॉन्फरन्स हॉलमध्ये ऑनलाइन सभा घेण्यात आली.
सदर सभेमध्ये कोलारा निसर्ग पर्यटन संकुलन येथील सहाय्यक व्यवस्थापक तसेच संकलनाचे व्यवस्थापक व कॅण्टर (ओपन बस) व्यवस्थापनाशी संबंधित असिस्टंट रिसॉर्ट मॅनेजर उपस्थित होते
सदर सभे मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा गेट वरून निसर्ग पर्यटन करिता सुरु असलेला कॅण्टर (ओपन बस) पासून प्राप्त महसुलात वाढ होण्याच्या दृष्टीने कॅण्टर (ओपन बस) सफारी दरात वाढ करण्याबाबत चर्चा करण्यात आली त्यानुसार कॅण्टर (ओपन बस) सफारीचे ऑफलाइन आरक्षणचे सध्याचे सफारी दर प्रति व्यक्ती 500 रु. आहे व त्यात नवीन मंजूर सफारी दर प्रति व्यक्ती सोमवार ते शुक्रवार 700 रु. व शनिवार, रविवार व इतर शासकीय सुटीच्या दिवशी 900 रु. प्रति व्यक्ती करण्याबाबत चर्चा करण्यात आली
