
चंद्रपूर :– चंद्रपूर शहरा जवळ असलेल्या सिन्हाळा येथील ग्रामस्थाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज दि. 21 मई 2022 रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
सदर घटनेत मृतकाचे नाव दशरथ पेंदोर वय (६५) वर्ष असून सिन्हाळा येथील रहिवासी आहे.
प्राप्त माहितीनुसार दशरथ बकऱ्या चारण्यासाठी गाव तलावा शेजारी काल दि. 20 मई 2022 शुक्रवार रोज गेलेला होता. संध्याकाळी परत न आल्याने गावकरी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळी शोधाशोध केले असता त्याचा मृतदेह गांव तलाव परिसरात छिन्न विच्छिन्न अवस्थेतील आढळला.
या।परिसरात मागील काही दिवसांपासून ताडोबातील प्रसिध्द “वाघडोह” नामक वाघाचा वावर आहे. तो जवळपास 20 वर्षांचा वृद्ध नर वाघ आहे. अशक्त असल्याने तो जंगलात शिकार करू शकत नसल्याने गावालगतचा परिसरात पाळीव जनावरांना मारून खात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार मागील 20 वर्षात या नर वाघाने कोणत्याही मनुष्याची हानी केलेली नाही. ही पहिलीच घटना आहे.
तसेच त्या परिसरातील पाळीव जनावरांसाठी धोका ठरू शकतो ही बाब लक्षात घेता वनविभागाची टीम त्या नर वाघावर नजर ठेवून होते. तरी देखील ग्रामस्थाचा जीव गेला यामुळे ग्रामस्थांमध्ये वनविभागा बद्दल तीव्र नाराजगी दिसून येत आहे.
