राज्यात कोरोना चा प्रकोप वाढlला असल्याने केंद्र शासनाने सर्व पर्यटन बंद करायचा निर्णय घेतला व ताडोबा पर्यटन 30 एप्रिल पर्यंत बंद करण्यात आले त्यामुळे बाहेरील पर्यटकांच्या गाड्या पद्मापूर गेट वरून येणे जाणे बंद करण्यात आले तरी देखील काही चार चाकी व दुचाकी सकाळ – सायंकाळ काळ्या पाण्याकडे फिरताना दिसत आहे. काल दिनांक 20 एप्रिल सायंकाळी 6 च्या समारास वाघाला बघण्यास जमलेला फ़ोटो सोशल मिडिया वर खुप वायरल झाला असल्याने खुप चर्चेत आहे. आधी पर्यटन शुरू असताना काही रविवारी येथे गस्त होतानी दिसत होते . पण आता बंद करण्यात आले.
ताडोबा बफ़र मध्ये आधीच वाघाची संख्या वाढलेली आहे . पानीच्या शोधात रोड क्रॉस करून डैम कड़े रोज जातात त्याचा बघण्यासाठी काही लोकांची गर्दी होऊ लागली आहे. फ़ोटोग्राफी करण्यास आपल्या गाडीच्या खाली व रोडच्या खाली गाड़ी उतरून फ़ोटो घेतात. सर्रास नियमाचे उल्लंघन होत आहे.
तेथे जवळच मोठा फलक आहे त्यात उल्लेख आहे वाघाच्या रस्ता रोखल्यास 5000 रु दंड घेण्यात येईल.
तरी काही कारवाही होत असताना दिसत नाही. नियम फक्त बोर्डा पुरतेच मर्यादित तर नाही
भविष्यात मानव व वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी व जीवित हानी टाळन्यासाठी यावर अंकुश लावणे गरजेजे आहे. ताडोबा प्रशासन ने याकड़े लक्ष द्यावे असे काही वन्यजीव प्रेमीचे म्हणणे आहे.