
चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यातील केळझर वनक्षेत्राच्या मधील दाबगाव येथे एका शेता मधील विहिरीत वाघाचा बछडा पडल्याची घटने आज दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळच्या समारास उघड़किस आली. वाघाला बघण्यासाठी लोकांची फार गर्दी जमा झाली होती. घटने माहिती वन विभागाला मिळताच लगेच आपल्या पथका सोबत घटना स्थळी दाखल झाले व त्या वाघाच्या बछडयां विहिरी बाहेर पहिल्यादा Catch strick च्या सहाय्याने त्याला सुखरूप बाहेर काढले.
हा बछडा अंदाजे पांच ते सहा महिन्यांचा नर वाघाचा बछडा असल्याचा सांगितले जात आहे. व त्यांला पुढील उपचारासाठी चंद्रपूरच्या वन्यजीव उपचार केंद्रात दाखल करण्यात आले.
त्यावेळी DFO जगताप मॅडम, ACF लखमावाड , वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर, वणपाल, वनरक्षक, व वणमजूर तथा आर आर यू टीम, व आर आर टी ताडोबा चमू प्रामुख्याने उपस्थित होते.
